`कितीही फोडाफोडी केली तरी राज्यात पुन्हा भाजप सरकार येणार नाही` - पृथ्वीराज चव्हाण
राज्यात शेतकऱ्यांची परिस्थिती अतिशय दयनीय झाली आहे. अशावेळी शेतकऱ्यांना पिकविमा कंपन्यांकडून
मुंबई : राज्यात शेतकऱ्यांची परिस्थिती अतिशय दयनीय झाली आहे. अशावेळी शेतकऱ्यांना पिकविमा कंपन्यांकडून, तसेच शासनाकडून मदत मिळवून देणे आवश्यक आहे. शेतकऱ्यांना पिककर्ज माफी देखील देणे अशावेळी गरजेचं आहे, तसेच कितीही फोडाफोडीचा प्रयत्न केला, तरी आता भाजपाचं सरकार पुन्हा राज्यात येणे शक्य नसल्याचं, काँग्रेसचे माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी म्हटलं आहे.
पृ्थ्वीराज चव्हाण यांनी भाजपवर आरोप करताना म्हटलं आहे की, 5 वर्षात या सरकारने कोणताही पायाभूत निर्णय घेतला नाही. शेतकरी कठीण परिस्थितीत असताना शेतकरी कर्जमाफीचा निर्णय घेणे आवश्यक असताना, सत्तेसाठी सर्वकाही चाललं असल्याचं यावेळी पृथ्वीराज चव्हाण यांनी म्हटलं आहे.
आमचं लक्ष हे राज्यपालांच्या भूमिकेकडे आहे, असं असलं, तरी देखील राज्यपाल महोदयांनी शेतकऱ्यांना मदत देण्याच्या बाबतीत निर्णय घेण्याची गरज असल्याचं पृथ्वीराज चव्हाण यांनी म्हटलं आहे.