मुंबई : एका इंग्रजी दैनिकाने राज ठाकरे यांच्या दौऱ्याविषयी जे वृत्त दिलं आहे, असं काहीही घडलेलं नाही, ते एक खोडसाळ वृत्त असल्याचं मनसे नेते नितीन सरदेसाई यांनी म्हटलं आहे. राज ठाकरे यांच्यासोबत मी या प्रवासात होतो, मात्र या प्रवासात असं काहीही घडलं नसल्याचं आपण ठामपणे सांगतोय, असं नितीन सरदेसाई यांनी एक पत्र लिहून कळवलं आहे. राज ठाकरे यांना हजार रूपये दंड झाला, ही घटना घडलीच नसल्याचं नितीन सरदेसाई यांनी म्हटलं आहे.


खालील प्रकार घडलेलाच नाही - नितीन सरदेसाई


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी सार्वजनिक ठिकाणी मास्क परिधान न केल्यामुळे त्यांना १००० रुपयांचा दंड करण्यात आला. राज ठाकरे यांना आपली चूक लक्षात येताच त्यांनी दिलगिरी व्यक्त करत १००० रुपयांचा दंड भरला, असं वृत्त 'मुंबई मिरर' या इंग्रजी दैनिकांत प्रसिद्ध झाले होते.  


राज ठाकरे हे शुक्रवारी मुंबई-मांडवा रो-रो फेरीने अलिबागला जात असताना हा प्रकार घडल्याचं संबंधित दैनिकाने म्हटलं होतं. मात्र यावर मनसे नेते नितीन सरदेसाई यांनी असं काहीही घडलेलं नसल्याचं म्हटलं आहे.