सौरभ पांडे, झी मीडिया, मुंबई  :  आता घरात बसून तुमच्या घराचं रजिस्ट्रेशन (flat registration) करु शकणार आहात. रिअल इस्टेट मार्केटमध्ये (Real Estate Market) हा आतापर्यंतचा सर्वात मोठा बदल मानला जातोय. घरबसल्या प्रॉपर्टीचं रजिस्ट्रेशन करण्यासाठी नेमकं काय करावं लागेल? पाहुयात एक रिपोर्ट. (now you flat registration at home an empirical basis in mumbai and pune know step by step)


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

आता तुम्ही घरात बसून तुमच्या प्रॉपर्टीचं रजिस्ट्रेशन करु शकणार आहात. तुम्ही अगदी परदेशातही असाल तरी तुम्ही प्रॉपर्टीचं रजिस्ट्रेशन करु शकाल. होय रिअल इस्टेट क्षेत्रातला हा आतापर्यंतचा सर्वात मोठा बदल मानला जातोय. घरात बसून रजिस्ट्रेशनसाठी नेमकं तुम्हाला काय करावं लागणार आहे बघुयात.


घरबसल्या रजिस्ट्रेशन, फक्त 'हे' करा


बिल्डरला रजिस्टारकडे एक फॉरमॅट बनवून द्यावा लागेल. बिल्डरकडे जाऊन ग्राहकाचं नाव, इतर माहिती देऊन डेटा अपलोड करावा लागेल.  अंतिम नोंदणी ऑनलाईन पद्धतीनं पूर्ण करण्यात येईल. ग्राहकांची माहिती सुरक्षित ठेवण्यासाठी ब्लॉकचेन टेक्नॉलोजीचा वापर.  ई-नोंदणीसाठी क्रेडाई-MCHI, मुद्रांक विभागाचं पाऊल. 



प्रायोगिक तत्वावर मुंबई-पुण्यात ही सुविधा सुरु करण्यात आलीय, फक्त नवीन घर खरेदीदारांनाच या सुविधेचा लाभ मिळणार आहे.