Ajit Doval in Mumbai : ऐन गणेशोत्सवात (Ganeshotsav 2022) राज्यासह मुंबईत दहशतवादी हल्ला आणि घातपात घडवण्याच्या धमक्या येत आहेत. याची आता केंद्रानं गंभीर दखल घेतलीय. त्यामुळे दुसरं तिसरं कुणी नव्हे तर भारताचे जेम्स बाँड (James Bond) समजले जाणारे राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवाल (Ajit Doval) हेच आता दहशतवाद्यांचे मनसुबे उधळून लावण्यासाठी मैदानात उतरले आहेत. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

अजित डोवाल हे सुरक्षेचा आढावा घेण्यासाठी थेट मुंबईत आले आहेत. आल्या आल्या त्यांनी बैठकांचा सपाटाच लावला. आधी ते राज्यपाल भगतसिंह कोश्यारींची (bhagat singh koshyari) यांना भेटले. त्यांच्याशी चर्चा केल्यानंतर अजित डोवाल यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) आणि उपमुख्यमंत्री आणि गृहमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadanvis) यांची भेट घेतली. 


डोवाल केवळ एवढ्यावरच थांबले नाहीत. तर सुरक्षेचे बारकावे जाणून घेण्यासाठी थेट पोलीस मुख्यालयात (Polit HeadQuarter) गेले. या बैठकी त्यांनी राज्याच्या पोलीस महासंचालक रजनीश सेठ (Maharashtra DGP Rajnish Seth) यांच्यासोबत बैठक घेतली. या बैठकीला मुंबईच्या पोलीस आयुक्तांसह इतरही आयपीएस अधिकारीही उपस्थित होते. गुप्तचर खात्याचे अधिकाऱ्यांनाही या पाचारण करण्यात आलं होतं. 


कोण आहेत अजित डोवाल? 
अजित डोवाल यांना भारताचे जेम्स बॉन्ड म्हणून ओळखले जातात
अजित डोवाल हे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार आहेत
अजित डोवाल हे 1968च्या बॅचचे आयपीएस अधिकारी
सैन्याकडून देण्यात येणारऱ्या किर्ती चक्राने गौरवण्यात आलेले पहिले पोलीस अधिकारी
2005 साली इंटेलिजेंस ब्युरोच्या प्रमुखपदावरून निवृत्त झाले. 
उरीच्या सर्जिकल स्ट्राईकचे नियोजनात महत्वाचा वाटा 


केंद्रीय गृहमंत्री अमित शाह पाच सप्टेंबरला मुंबईच्या दौऱ्यावर आहेत. त्या पार्श्वभूमीवर डोवाल यांचा हा दौरा महत्त्वाचा मानला जातोय. गेल्या काही दिवसांत दहशतवाद्यांचं माहेर घर असलेल्या पाकिस्तानातून मुंबईत घातपात घडवण्याच्या धमक्या येत आहेत. त्यातच रायगडच्या किनाऱ्यावर शस्त्रास्त्रांनी भरलेली बोट सापडली होती. त्यामुळे ऐन गणेशोत्सवात दहशतवाद्यांचे मनसुबे उधळून लावण्यासाठी भारताच्या जेम्स बाँडची करडी नजर मुंबईवर असणार आहे.