मुंबई : ओबीसी समाजाच्या शिष्टमंडळाने आज राज्यापालांची भेट घेतली. सरकार बरखास्त करण्याची करण्याची शिष्टमंडळाने राज्यपालांकडे मागणी केलीय. स्वातंत्र्यानंतर पहिल्यांदाच राज्यात आरक्षणाचा खेळखंडोबा राज्य सरकारने मांडला आहे असंही प्रकाश शेंडगे यांनी म्हटलं आहे. मराठा समाजाला या सरकारने एसईबीसीमध्ये म्हणजेच ओबीसींमध्ये आरक्षण देण्याचा निर्णय घेताला या निर्णयामुळे ओबीसी समाजाचा विश्वासघात केल्याची टीका शेंडगेंनी सरकारवर केली आहे. न्यायालयातही सरकारने ओबीसी आरक्षणाविरोधात भूमिका घेतल्यानं सरकारच्या बरखास्तीची मागणी शेंडगे यांनी राज्यापालांकडे केली आहे.


मराठा समाजाला एसईबीसीमध्ये आरक्षण देण्याची घोषणा झाल्यानंतर ओबीसी समाजाच्या नेत्यांनी याला विरोध केला होता. मुख्यमंत्र्यांना भेटून त्यांनी याबाबत विरोध देखील दर्शवला होता. मराठा समाजाला या प्रवर्गातून आरक्षण दिल्यास ओबीसी प्रवर्गातील आरक्षणाला धक्का लागेल अशी शक्यता ओबीसी नेत्यांनी व्यक्त केली आहे.