मुंबई : पावसानं विश्रांती घेतल्यांनंतर आता मुंबईत ऑक्टोबर हिटचा तडाखा जाणवू लागलाय.. मुंबईचं कमाल तापमान ३३ अंशावर पोहोचलंय तर आर्द्रता ९४ टक्के नोंदवण्यात आलीये. त्यामुळे मुंबईकर घामाघूम झालाय.. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

बदलत्या वातावरणासोबतच मुंबईकरांना प्रखर सूर्यकिरणांना सामोरं जावं लागतं.. या उष्णतेत आणखीन वाढ होणार असल्याचा इशारा हवामान खात्यानं दिलाय..


राज्याच्या इतर भागातही तापमान वाढू लागलंय. अशा वातावरणात संसर्गामुळे होणा-या आजारांचे प्रमाण वाढू शकते, शिवाय डोळे जळजळणे, अंगदुखी, चक्कर येणे, थकवा येणे, भूक मंदावणे, अॅसिडीटी असे आजार होण्याची शक्यता आहेत त्यामुळे नागरिकांनी काळजी घेणं गरजेचं आहे..