मुंबई : मुंबईत विधानभवनावर मोर्चा घेऊन निघालेल्या ओला उबेर चालकांना पोलिसांनी ताब्यात घेतलं. त्यामुळे आता हा मोर्चा भारतमाता ते विधानभवन असा होणार नाही. आता थेट आझाद मैदान इथेच थेट ओला-उबर चालक जमा होणार आहेत. दरम्यान, दिवाळीपूर्वी ओला उबर चालक-मालकांनी १२ दिवस आपल्या विविध मागण्य़ांसाठी संप पुकारला होता. मात्र, परिवहन मंत्री दिवाकर रावतेंनी दिलेल्या आश्वासनानंतर हा संप मागे घेण्यात आला होता.


पुन्हा संपाच हत्यार 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

 दिलेलं आश्वासन न पूर्ण न केल्यानं ओला उबर चालकांनी पुन्हा संपाचं हत्यार उपसलं. तसंच अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी ओला-उबर चालक विधानभवनावर धडकणार होते.


मात्र, मोर्चा सुरु होण्यापूर्वीच त्यांना भारतामाता इथून ताब्यात घेण्यात आलं. 


काय आहेत मागण्या ?


ऑनलाइन टॅक्सीचे कमीत कमी भाडे १०० ते १५० रुपये दरम्यान असावे, प्रति किलोमीटरमागे १८ ते २३ रुपये भाडे असावे, कंपनीने नवीन वाहने बंद करून सुरू असलेल्या वाहनांना समान काम द्यावे या मागण्यांसाठी २२ ऑक्टोबरपासून ओला, उबर चालक बेमुदत संपावर गेले होते.


बैठकीत काय ठरलं होतं ?


- ओला उबेर चालकांना जास्त उत्पन्न मिळावे म्हणून विशेष योजना लागू करणार


- ओला उबेरकडून पेट्रोल-डिझेलच्या दराशी सुसंगत दर चालकाला देण्याचे मान्य


- हे नवे दर ठरवून ओला उबेर आणि संघटनेच्या प्रतिनिधींबरोबर चर्चा करणार आणि अंतिम करणार


- पुढील बैठकीत ओला उबेरने ठरवलेले दर मान्य झाले नाहीत तर पुन्हा संपावर जाण्याचा इशारा