मुंबई : Omicron Prediction in Mumbai ओमायक्रॉन विषाणूचा धोका लक्षात घेता जिनोम सिक्वेसिंग टेस्टींग किट मुंबई महानगरपालिका खरेदी (Mumbai Municipal Corporation) करणार आहे. यासाठी निविदा काढण्यात येणार आहे. कस्तुरबा आणि केईएम हॉस्पिटलमध्ये प्रत्येकी सुमारे आठशे किट लवकरच उपलब्ध होणार आहे. बाहेरून येणाऱ्या प्रवाशांमध्ये ओमायक्रॉनचे निदान लवकर व्हावे यासाठी हे कीट महत्वाचं आहे.


लहान मुलांना अधिक धोका


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

दरम्यान, संभाव्य तिसऱ्या लाटेचा धोका लहान मुलांना अधिक असल्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. युरोपमधील 5 ते 14 वयोगटातील मुलांमध्ये ओमयाक्रॉनचे संक्रमण झाले आहे. तर, अनेक देशांमध्ये लहान मुलांमधील संक्रमणात 2 ते 3 टक्क्यांची वाढ झाली असल्याचं WHOने सांगितले. लहान मुलांची काळजी घेण्याचे आवाहनही WHO ने केलं आहे. 



जूननंतर सामान्य स्थिती होईल


जून 2022मध्ये जनजीवन पूर्वपदावर येईल असा दावा जागतिक आरोग्य संघटनेचे माजी सल्लागार डॉ. सुभाष साळुंखे यांनी व्यक्त केलाय.. कोरोनाचा नवा व्हेरियंट ओमायक्रॉन हा वेगानं पसरत असला तरी भविष्यात कोरोनातील व्हायरलंसन्स म्हणजेच बदल कमी होतील असा दावा त्यांनी केलाय.