दिलासा देणारी बातमी । राज्यात १८८ कोरोनाबाधित रुग्ण ठणठणीत
महाराष्ट्र राज्यात कोरोनाचे संकट वाढत आहे. मात्र, एक दिलासा देणारी बातमी हाती आली आहे.
मुंबई : राज्यात कोरोनाचे संकट वाढत आहे. मात्र, एक दिलासा देणारी बातमी हाती आली आहे. राज्यात आतापर्यंत १८८ कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण बरे झाले आहेत. ही माहिती राज्याचे आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी दिली. दरम्यान, काल २१० नवीन रुग्णांचे निदान झाले आहे. आता राज्यातील एकूण रुग्णसंख्या १५७४वर पोहोचली आहे. सध्या राज्यात ११७६ रुग्णांवर उपचार सुरु आहेत.
४७३८ जण संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये
आजपर्यंत पाठविण्यात आलेल्या ३३ हजार ९३ नमुन्यांपैकी ३० हजार ४७७जणांचे प्रयोगशाळा नमुने कोरोनाकरिता निगेटिव्ह आले आहेत तर १५७४ जण पॉझिटिव्ह आले आहेत.आतापर्यंत १८८ कोरोना बाधित रुग्णांना ते बरे झाल्यानंतर रुग्णालयातून घरी सोडण्यात आले आहे. सध्या राज्यात ३८ हजार ९२७ व्यक्ती घरगुती अलगीकरणात असून ४७३८ जण संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये आहेत.
१३ कोरोना बाधित रुग्णांचा मृत्यू
राज्यात काल १३ कोरोना बाधित रुग्णांचा मृत्यू झाला आहे. त्यात मुंबईचे १० तर पुणे, पनवेल आणि वसई विरार येथील प्रत्येकी १ आहे. आज झालेल्या मृत्यूंपैकी ९ पुरुष तर ४ महिला आहेत. आज झालेल्या १३ मृत्यूंपैकी ६ जण हे ६० वर्षांवरील आहेत ५ रुग्ण हे वय वर्षे ४० ते ६० या वयोगटातील आहेत तर दोघेजण ४० वर्षांपेक्षा लहान आहेत. मृत्युमुखी पडलेल्या ११ रुग्णांमध्ये (८५ टक्के) मधुमेह, उच्च रक्तदाब, अस्थमा, हृदयरोग अशा स्वरुपाचे अतिजोखमीचे आजार आढळले आहेत.
राज्यातील ज्या भागात रुग्णांचे क्लस्टर सापडले आहेत त्या ठिकाणी केंद्र सरकारच्या मार्गदर्शनानुसार क्लस्टर कंटेनमेंट कृतियोजना अंमलात आणण्यात येत आहे. राज्यात या प्रकारे एकूण ४३७४ सर्वेक्षण पथके काम करत असून त्यांनी साडेसोळा लाखाहून अधिक लोकसंख्येचे सर्वेक्षण केले आहे, अशी माहिती राजेश टोपे यांनी दिली.
राज्यातील जिल्हा आणि पालिकानिहाय रुग्ण तपशील
मुंबई महानगरपालिका १००८ (मृत्यू ६४)
ठाणे ०३
ठाणे मनपा २८ (मृत्यू ०३)
नवी मुंबई मनपा ३२ (मृत्यू ०२)
कल्याण डोंबवली मनपा ३४ (मृत्यू ०२)
उल्हासनगर मनपा ०१
मीरा भाईंदर मनपा २१ (मृत्यू ०१)
पालघर ०३ (मृत्यू ०१)
वसई विरार मनपा १२ (मृत्यू ०३)
पनवेल मनपा ०६ (मृत्यू ०१)
ठाणे मंडळ एकूण ११४७ (मृत्यू ७७)
नाशिक ०१
नाशिक मनपा ०१
मालेगाव मनपा ०५ (मृत्यू ०१)
अहमदनगर ०९
अहमदनगर मनपा १६
जळगाव ०१
जळगाव मनपा ०१ (मृत्यू ०१)
नाशिक मंडळ एकूण ३४ (मृत्यू ०२)
पुणे ०७
पुणे मनपा २१९ (मृत्यू २५)
पिंपरी चिंचवड मनपा २२
सातारा ०६ (मृत्यू १)
पुणे मंडळ एकूण २५४ (मृत्यू २६)
कोल्हापूर मनपा ०५
सांगली २६
सिंधुदुर्ग ०१
रत्नागिरी ०५ (मृत्यू १)
कोल्हापूर मंडळ एकूण ३७ (मृत्यू १)
औरंगाबाद ०१
औरंगाबाद मनपा १६ (मृत्यू ०१)
जालना ०१
हिंगोली ०१
औरंगाबाद मंडळ एकूण १९ (मृत्यू १)
लातूर ००
लातूर मनपा ०८
उस्मानाबाद ०४
बीड ०१
लातूर मंडळ एकूण १३
अकोला मनपा १२
अमरावती मनपा ४ (मृत्यू १)
यवतमाळ ०४
बुलढाणा १३ (मृत्यू ०१)
वाशिम ०१
अकोला मंडळ एकूण ३४ (मृत्यू ०२)
नागपूर मनपा २५ (मृत्यू ०१)
गोंदिया ०१
नागपूर मंडळ एकूण २६ (मृत्यू १)
इतर राज्ये ०९
एकूण १५७४ (मृत्यू ११०)