मुंबईत आणखी एका पोलीस कर्मचाऱ्याचा कोरोनामुळे मृत्यू
राज्यात आतापर्यंत 1,388 पोलिसांना कोरोनाची लागण
मुंबई : बुधवार रात्री मुंबईतील आणखी एका पोलीस कर्मचाऱ्याचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. विक्रोळी पोलीस स्टेशनमध्ये ते कार्यरत होते. राज्यात आतापर्यंत 1,388 पोलिसांना कोरोनाची लागण झाली आहे. ज्यापैकी 948 जणांवर उपचार सुरु असून 428 जणांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. कोरोनामुळे महाराष्ट्रात आतापर्यंत 13 पोलीस कर्मचाऱ्यांचा मृत्यू झाला आहे.
महाराष्ट्रात कोरोनाचा प्रसार अजूनही सुरुच आहे. रुग्णांची संख्या वाढत चालली आहे. महाराष्ट्रात कोरोनाच्या रुग्णांची संख्या 39,297 वर पोहोचली आहे. मागील 24 तासात महाराष्ट्रात 2,250 नवे रुग्ण वाढले आहेत. तर 65 जणांचा मृत्यू झाला आहे.
राज्यात आतापर्यंत 1390 जणांचा मृत्यू झाला असून बुधवारी 679 जण बरे झाले आहेत. आतापर्यंत एकूण 10,318 रुग्ण बरे झाले आहेत.
मुंबईत कोरोना रुग्णांची संख्या 24,118 वर पोहोचली आहे. मागील 24 तासात मुंबईत कोरोनाचे 41 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. मुंबईत आतापर्यंत 841 जणांचा मृत्यू झाला आहे.
मुंबईतील हॉटस्पाट असलेल्या धारावीत बुधवारी कोरोनाचे 25 रुग्ण वाढले आहेत. धारावीत आतापर्यंत 1378 रुग्ण आढळले आहेत.