मुंबई : सकाळपासून बेपत्ता झालेलं ओएनजीसीच्या हेलिकॉप्टरचे अवशेष सापडले आहेत.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

आतापर्यंत 4 जणांचे मृतदेह हाती लागले आहेत. इतरांचा अजून शोध सुरु आहे. या सर्च ऑपरेशनसाठी 5 जहाज, 2 डार्नियर आणि 2 हेलिकॉप्टरची मदत घेतली जात आहे. ओएनजीसीच्या या चॉपरने शनिवार सकाळी 10.20 वाजता जुहू एयरपोर्टवरुन उड्डान केलं होतं. यानंतर हेलिकॉप्टरचा संपर्क तुटला. एअर ट्रॅफिक कंट्रोलसोबत हेलिकॉप्टरचा शेवटचा संपर्क सकाळी 10.35 वाजता झाला.


या हेलिकॉप्टरला बॉम्बे हायवर सकाळी 11 वाजता पोहोचणं अपेक्षित होतं पण ते पोहोचलं नाही. या हेलिकॉप्टरमध्ये 2 कॅप्टनसह 7 कर्मचारी होते. ज्यामध्ये पांच ओएनजीसीचे डीजीएम लेवलचे अधिकारी होते.


हेलिकॉप्टरची सूचना न मिळाल्यानंतर सर्च ऑपरेशन सुरु झालं. कोस्ट गार्डचे जहाज या हेलिकॉप्टरच्या शोधात निघाले. इंडियन नेवीच्या मदतीने अनेक तास हे सर्च ऑपरेशन सुरु होतं. ज्यानंतर मुंबई कोस्टपासून 22 मील दूर हेलिकॉप्टरचे अवशेष सापडले आहेत.