मुंबई : अवकाळी पावसामुळे कांद्याला मोठा फटका बसला आहे. कांदा प्रतिक्विंटल साडेपाच हजारांवर पोहचला आहे. आठवडाभरात कांद्याचे दर प्रतिक्विंटर ६ हजारांचा टप्पा ओलंडण्याची शक्यता निर्माण झाली आहे. गेल्या २४ तासात हा दर ५ हजार ५५१ रुपये प्रतिक्विंटलवर पोहचला होता. जिल्ह्यातील सर्व बाजार समितीत गेल्या पंधरवड्यात अवकाळी पावसामुळे कांद्याच्या दरात मोठी वाढ झाल्यानं सरासरी २ हजार ५०० रुपये असलेला हा दर थेट साडेपाच हजारांवर गेला आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

कांदा उत्पादक शेतकऱ्यांना देखील याचा मोठा फटका बसला आहे. रविवारी कांद्याला ५५० ते ५८० रुपये प्रति १० किलो दर मिळाला. परतीच्या पावसाने यंदा शेतकऱ्यांचे चांगलेच हाल केले. कांद्यासह अनेक पिकांना याचा फटका बसला आहे. इतर राज्यातून देखील कांद्याची मागणी वाढल्य़ामुळे कांद्याला मोठा भाव मिळाला आहे. नवीन कांदा येण्यासाठी आणखी १ महिना जाणार आहे. तोपर्यंत कांदा १०० रुपये प्रति किलोच्या घरात पोहोचण्याची शक्यता आहे. 


सध्या किरकोळ बाजारातून सर्वसामान्यांना कांदा ८० रुपये किलोच्या दराने घ्यावा लागत आहे. त्यामुळे सर्वसामान्यांच्या खिशाला देखील कांदा आता न परडवणारा ठरत आहे.