मुंबई : पुरवठा कमी होत असल्याने टोमॅटोचे भाव देशातील १७ मुख्य शहरांमध्ये ९० रुपयांच्या वर पोहोचले आहे. दिल्ली, कोलकाता, इंदौर आणि तिरुवनंतपुरम सारख्या शहरांमध्येही टोमॅटोचे भाव १०० रुपयांच्या आकड्यावर पोहोचले आहे. पाऊस आणि पूर यामुळे टोमॅटोचे उत्पादन कमी झाले. ऑगस्ट महिन्याच्या शेवटपर्यंत अशीच स्थिती राहण्याची शक्यता आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

टोमॅटोनंतर आता कांदा देखील सामान्यांना रडवणार असं दिसतंय. सर्वात मोठँ कांदा बाजार असलेल्या लसलगावमध्ये देखील कांद्याचे भाव वाढत आहे. लासलगाव मार्केटमध्ये दोन आठवड्यात कांद्याचे भाव दुप्पट झाले आहेत. शुक्रवारी कांद्याचे भाव 19 महिन्यांमधील किंमतीच्या तुलनेत वाढले आहेत. सध्या नवा कांदा अजून बाजारात आलेला नाही. शेतकऱ्याने देखील जुना कांदा विकला आहे.


२० ते २५ रुपये किलो भाव असणाऱ्या टोमॅटोचे भाव गेल्या ३ महिन्यात १०० रुपयांच्या जवळ पोहोचले आहे. हिच गोष्ट कांद्याच्या बाबतीत देखील घडू शकते. लासलगावमध्ये येणारा कांदा आता कमी झाला आहे.