मुंबई : शेतकऱ्यांच्या कर्जमाफीचा ऑनलाईन अर्ज किचकट असल्याचा विरोधकांचा दावा मुख्यमंत्र्यांनी विधानसभेत फेटाळून लावलाय. ऑनलाईनच अर्ज स्विकारला जाणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

कर्जमाफीचा अर्ज केवळ दोन पानांचा असून सुटसुटीत असल्याचा दावा मुख्यमंत्र्यांनी केला. तसंच राज्यात २६ हजार आपलं सरकार सुविधा केंद्र सुरू करण्यात आलेली असून तिथं जाऊनही शेतक-यांना अर्ज भरता येणार असल्याची माहिती फडणवीस यांनी दिली.


तसंच उद्यापासून कर्जमाफीचा अर्ज भरण्यासाठी मोबाईल अॅपही लॉन्च करण्यात येणार असल्याची घोषणा मुख्यमंत्र्यांनी केली. तसंच २०१६ साली कर्जाचं पुनर्गठन केलेल्या शेतक-यांनाही कर्जमाफीच्या योजनेत सहभागी करून घेणार असल्याचं मुख्यमंत्र्यांनी सांगितलं.