मुंबई : मुंबईमधली कोरोनाग्रस्तांची संख्या पाहता महापौर किशोरी पेडणेकर यांनी महत्त्वाचं वक्तव्य केलं आहे. गंभीर आणि तातडीने उपचारांची गरज असलेल्यांनाच हॉस्पिटलमध्ये बेड मिळावा, असं वक्तव्य किशोरी पेडणेकर यांनी केलं आहे. रुग्णांची कोरोना टेस्ट पॉझिटिव्ह आल्याबरोबर, लगेचच बेड मिळावा असं त्यांना वाटतं, पण असं होऊ शकत नाही. हॉस्पिटल्सवरही खूप तणाव आहे, अशी प्रतिक्रिया किशोरी पेडणेकर यांनी दिली आहे. 



काहीच वेळापूर्वी विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी हॉस्पिटलमधल्या बेडच्या प्रश्नावरुन सरकारवर टीका केली होती. 'महात्मा फुले जनआरोग्य योजना फक्त नोंदणीकृत रुग्णालयात केली जात आहे. काही मोठ्या रुग्णालयात बेड्स नाहीत, असं दाखवलं जात आहे, पण मागच्या दरवाजाने प्रवेश दिला जातोय. खासगी रुग्णालयांचे ८० टक्के बेड्स कागदावरच घेतले आहेत', असा आरोप फडणवीस यांनी केला आहे.


राज्यात कोरोना टेस्टचा दर ७ दिवसात निश्चित होणार