'₹45 लाख दिले तरच राष्ट्रीय संघातून खेळेन!' भारतीय खेळाडूची अट; म्हणाला, 'भविष्यात मी..'

India Player Demanded 45 Lakh Rs To Play For Country: या खेळाडूनेही आपली बाजू मांडली असून आपली मागणी कशी बरोबर आहे हे त्याने सांगितलं आहे. नेमकं या खेळाडूचं म्हणणं काय आहे आणि त्याने काय युक्तिवाद केला आहे पाहूयात...

| Sep 21, 2024, 08:59 AM IST
1/16

nagalsumit

₹45 लाख दिले तरच टीम इंडियासाठी खेळेन! ही आपली मागणी योग्य कशी आहे याचा युक्तिवादही त्याने केला आहे. नेमका हा खेळाडू आहे तरी कोण आणि त्याचं काय म्हणणं आहे पाहूयात...

2/16

nagalsumit

ऑल इंडिया टेनिस असोसिएशनने (एआयटीए) गुरुवारी भारतामधील अग्रगण्य टेनिसपटू सुमीत नागलबद्दल धक्कादायक दावा केला आहे.   

3/16

nagalsumit

भारतीय संघाकडून डेव्हिस कप स्पर्धा खेळण्यासाठी सुमीत नागल तब्बल 50 हजार अमेरिकी डॉलर्स म्हणजेच भारतीय चलनानुसार 45 लाख रुपये मागितल्याचा दावा एआयटीएने केला आहे.   

4/16

nagalsumit

मी डेव्हिस कपमध्ये खेळावं असं वाटत असेल तर वर्षाकाठी आपल्याला 50 हजार अमेरिकी डॉलर्स एआयटीएने दिले पाहिजेत. ही सामान्य बाब आहे. अशाप्रकारे खेळाडूंना त्यांच्या सेवेसाठी पैसे दिले जातात, असं भारतामधील पहिल्या क्रमांकाचा टेनिसपटू असलेल्या सुमीत नागलने म्हटलं आहे.    

5/16

nagalsumit

सुमीत नागलने स्वीडनविरुद्धच्या डेव्हिस कपमधून माघार घेतली आहे. आपल्या पाठीला दुखापत झाली आहे, असा दावा सुमीतने केला आहे. याच कारणामुळे तो अमेरिकन खुल्या टेनिस स्पर्धेमधून बाहेर पडला होता.

6/16

nagalsumit

स्वीडनविरुद्धच्या सामन्यांमध्ये त्यांच्याच मैदानावर त्यांना पराभूत करण्याची चांगली संधी भारताकडे चालून आली होती. सुमीत नागल संघात नसल्याचा फटका भारतीय संघाला बसला आहे. भारतीय संघाचा 0-4 ने पराभव झाला आहे. या संघात प्रामुख्याने दुहेरी सामने खेळणारे आणि नवखे टेनिसपटू होते.   

7/16

nagalsumit

या प्रकरणानंतर ऑल इंडिया टेनिस असोसिएशनने (एआयटीए) उघडपणे सुमीत नागल, युकी भांबरी आणि शशीकुमार मुकुंद या तिघांनी राष्ट्रीय ड्युटी पूर्ण केली नाही असं म्हटलं आहे. याबद्दल उघडपणे त्यांनी नाराजीही व्यक्त केली आहे. 

8/16

nagalsumit

एआयटीएचे सचिव अनिल धुनपर यांनी नाराजी व्यक्त करताना, "तुम्ही मला सांगा देशाकडून खेळण्यासाठी खेळाडूंनी पैसे मागण्याची काय गरज आहे?" असा सवाल विचारल्याचं पीटीआयच्या वृत्तात म्हटलं आहे.

9/16

nagalsumit

"देशाकडून खेळण्यासाठी अशाप्रकारे पैसे का मागतात? हा मोठा प्रश्न आहे. त्याने वर्षाकाठी 50 हजार अमेरिकी डॉलर्स म्हणजेच अंदाजे 45 लाख रुपये मागितले आहेत. नाहीतर आपण खेळणार नाही, असंही तो म्हणालाय," अशी माहिती अनिल धुनपर यांनी दिली.

10/16

nagalsumit

"देशासाठी खेळणं आणि देशाचं प्रतिनिधित्व करणं हे माझ्यासाठी कायमच अभिमानाची बाब राहिली आहे," असं सुमीत नागलने आपल्या इन्स्टाग्रामवरुन या प्रकरणी स्पष्टीकरण देणाऱ्या पोस्टमध्ये म्हटलं आहे. 

11/16

nagalsumit

"मी ऑलिम्पिकमध्ये भारताचं प्रतिनिधित्व करु शकलो ही माझ्या करिअरमधील सर्वोत्तम गोष्टींपैकी एक आहे. मात्र डेव्हीस कपमधून माघार घेणं फार कठीण निर्णय होता. कारण देशाकडून खेळणं मला महत्त्वाचं वाटतं," असं सुमीत नागल म्हणाला आहे.  

12/16

nagalsumit

"मी माझ्या मेडिकल टीमबरोबर चर्चा केली असता, दुखापतीसहीत खेळल्यास माझ्या प्रकृतीवर परिणाम होण्याबरोबरच संघालाही त्याचा फटका बसला असता. माझा यावर ठाम विश्वास आहे की, दुखापतग्रस्त असताना खेळून मी धोका पत्कारण्यापेक्षा माझ्याऐवजी एखाद्या 100 टक्के तंदरुस्त व्यक्तीने खेळावे. मी याबद्दल एआयटीए फार पूर्वीच कल्पना दिली होती," असंही सुमीत नागलने म्हटलं आहे.  

13/16

nagalsumit

"प्रोफेश्नल स्पोर्ट्समध्ये दुखापतीसंदर्भातील व्यवस्थापन हे फार गुंतागुंतीचं असतं. कधीतरी काही दिवसांच्या आरामामुळे फरक पडतो. मी माझ्या मेडिकल टीमच्या संपर्कात असून माझ्या खेळावरही काम करतोय. लवकरात लवकर कोर्टवर येण्याचा माझा प्रयत्न आहे," असं सुमीत नेगीने म्हटलं आहे.  

14/16

nagalsumit

"मोबदल्याबद्दल बोलायचं झालं तर खेळामध्ये ही सर्वसामान्य बाब आहे की खेळाडूंना त्यांच्या सेवेसाठी आणि सहभागासाठी अगदी स्वत:च्या देशासाठी खेळायचं असेल तरी पैसे दिले गेले पाहिजे. यात कोणताही खासगी हेतू नाही. मी एआयटीए आणि डेव्हीस कपच्या कर्णधाराबद्दल काय बोललो हे गुप्तच ठेवत आहे. मला याबद्दल शक्यतांचा भडिमार नकोय," असं सुमीत नागलने स्पष्ट केलं आहे.   

15/16

nagalsumit

"मी माझ्या देशाबद्दल प्रमाणिक आहे. जेव्हा जेव्हा मी देशाचं नेतृत्व करेन ते पूर्ण प्रयत्नांनी करेन," असंही सुमीत नागलने म्हटलं आहे.  

16/16

nagalsumit

"भविष्यात मी भारतीय संघाची जर्सी घालून टेनिस कोर्टवर आणि कोर्टाबाहेरही देशाला अभिमान वाटेल अशी कामगिरी करेल अशी अपेक्षा आहे. तुमच्या पाठिंब्यासाठी धन्यवाद," असं सुमीत नागलने शेवटी म्हटलं आहे.