मुंबई : मुंबई पोलिसांच्या ड्युटीचे तास आता फक्त आठ तास झालेत. नवीन वर्षाची जणू एक विलक्षण भेटचं मुंबई पोलिसांना मिळाली आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

मिशन 8 अवर्स या कार्यक्रमात मुंबई पोलीस आयुक्त दत्ता पडसलगीकर यांनी ही घोषणा केली. गेल्या वर्षभरापासून मुंबई पोलीस दलातील देवनार आणि नंतर काही पोलीस स्टेशनमध्येही “ऑन ड्युटी ८ तास” संकल्पना राबवण्यात आली. सुरुवातीला काही अडचणीं आल्या पण त्यावर वरीष्ठ पातळीवर तोडगा काढण्यात आला आणि हा प्रयोग यशस्वी झाला. त्यानुसार मुंबईतील प्रत्येक पोलीस स्टेशनमधील पोलीसांची संख्या लक्षात घेऊन आता सर्वच पोलीस स्टेशनमध्ये ही संकल्पना राबवली जाणार आहे.