मुंबई :  युक्रेनमधील युद्धामुळे (Ukraine Russia War) सर्वत्र भीतीचं वातावरण आहे. अशा परिस्थितीत केंद्र सरकार तिथे अडकलेल्या आपल्या भारतीय नागरिकांना परत आणण्यासाठी काय करत आहे, असा प्रश्न अनेक दिवसांपासून उपस्थित केला जात होता. अशा परिस्थितीत आज (26 फेब्रुवारी) संध्याकाळी युक्रेनमधून भारतात अनेक विद्यार्थी सुखरुप पोहचले आहेत. या विमानातून एकूण 219 विद्यार्थी मायदेशी परतले. या वेळेस स्वत: केंद्रीय मंत्री पियुष गोयल यांनी विमानतळावर  विद्यार्थ्यांचं स्वागत केलं. तसंच त्यांना धीर देण्याचा प्रयत्न केला. (operation ganga 1st evacuation flight carrying 219 passengers from Ukraine has landed in  mumbai airport)


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING


 
"या संकटाच्या सुरुवातीपासूनच युक्रेनमध्ये अडकलेल्या प्रत्येक भारतीयाला परत आणणं हे सरकारचं मुख्य उद्दिष्ट आहे. 219 विद्यार्थी येथे पोहोचले आहेत. ही पहिली तुकडी होती, दुसरी तुकडी लवकरच दिल्लीला पोहोचेल. युक्रेनमधील सर्व भारतीय परत येत नाही, तोवर आम्ही थांबणार नाही", अशी प्रतिक्रिया पियूष गोयल यांनी दिली.  
 
यूक्रेनमधून भारतात सुखरुप परतलेल्या विद्यार्थ्यांच्या डोळे पाणावलेले होते. आपण सुखरुप भारतात पोहचलोय, अशी भावमूद्रा त्या विद्यार्थ्यांची होती. "भारत सरकारवर आमचा पूर्ण विश्वास होता. पण युद्धजन्य वातावरणात आम्ही सगळेच खूप घाबरलो होतो. सरकारने आम्हाला सुखरुप भारतात आणलं", अशी प्रतिक्रिया भारतात परतलेल्य एका विद्यार्थ्याने दिली.  युक्रेनमधील भारतीयांना 'ऑपरेशन गंगा' (operation ganga) नुसार मायदेशी आणण्यात आलं आहे.