मुंबई विमानतळाची मुख्य धावपट्टी ६५ तासानंतर पुन्हा एकदा कार्यरत
धावपट्टी बंद असल्याने अनेक विमाने रद्द
मुंबई | मुंबई विमानतळाची मुख्य धावपट्टी पुन्हा एकदा कार्यरत झाली आहे. सुमारे 65 तासानंतर मुख्य धावपट्टी कार्यरत झाली आहे. धावपट्टी बंद असल्याने अनेक विमाने रद्द तर काही विमानं इतर ठिकाणी वळवण्यात आली होती. स्पाईस जेटचे विमान धावपट्टीहून घसरल्यामुळे 09/27 ही मुख्य धावपट्टी बंद होती.
दिवस-रात्र काम करुन चिखलात अडकलेले विमान बाजूला करण्यात यश आले आहे. कर्मचाऱयांनी 130 बाय 20 मीटर चा दगडी रस्ता बनवला त्यावर स्टील प्लेट टाकत मशीनच्या साह्याने ४१ टन विमान बाहेर काढले गेले. अग्निशमन दलाच्या जवानांचीही याकामी मदत झाली.