मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे कट्टर विरोधक मानले जाणारे आमदार गणेश नाईक वर्षा बंगल्यावर
ठाण्यातील दोन मोठे नेते आणि एकमेकांचे विरोधक आले एकत्र.
मुंबई : राष्ट्रवादीतून भाजपमध्ये आलेले आमदार गणेश नाईक (Ganesh Naik on varsha bunglow) हे वर्षा बंगल्यावर पोहोचले आहेत. ही बातमी ऐकून अनेकांच्या भूवया उंचावल्या असतील. कारण अनेक वर्षांपासून गणेश नाईक आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे एकमेकांचे कट्टर विरोधक मानले जातात. या दोन्ही नेत्यांचं एकमेकांशी कधीच जमले नाही. पण आता गणेश नाईक वर्षा बंगल्यावर पोहोचल्याने अनेकांच्या भूवया उंचाल्या आहेत.
आज गणेश नाईक वर्षावर एकनाथ शिंदे यांच्याकडे (Ganesh naik and cm Eknath shinde) गणरायाच्या दर्शनाला आल्यामुळे राजकीय वर्तुळात एकच खळबळ उडाली आहे. ठाण्यातील हे एकमेकांचे कट्टर विरोधक आज एकत्र आले आहेत.
काही दिवसांपूर्वी महाविकासआघाडी सरकार कोसळल्यानंतर एकनाथ शिंदे मुख्यमंत्री झाले. शिवसेनेत दोन गट पडले. शिंदे गट आणि भाजप एकत्र आले पण स्थानिक पातळीवर काही प्रमाणात कुरबुरी सुरु होती. काही दिवसांपूर्वी नवी मुंबईतील शिंदे गटातील नगरसेवक भाजपमध्ये आले.