शेतकऱ्यांच्या सरसकट कर्जमाफीच्या चर्चेची विरोधकांची मागणी
शेतकरी कर्जमाफीवरुन विधान परिषदेतही विरोधक आक्रमक झाल्याचं पाहायला मिळालं.
मुंबई : शेतकरी कर्जमाफीवरुन विधान परिषदेतही विरोधक आक्रमक झाल्याचं पाहायला मिळालं. शेतक-यांच्या सरसकट कर्जमाफी संदर्भात सरकारनं चर्चा करावी अशी मागणी विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी केली. मात्र विरोधकांची ही मागणी सरकारनं फेटाळली. त्यामुळे विरोधक आक्रमक झाले आणि वेलमध्ये येऊन सरकारविरोधात जोरदार घोषणाबाजी केली.
शेतकरी कर्जमाफीसोबतच विधीमंडळ सुरक्षेचा मुद्दाही विधान परिषदेत उपस्थित झाला. उत्तर प्रदेश विधानसभेत स्फोटकं सापडल्याच्या पार्श्वभूमीवर सुरक्षा प्रक्रियेत सर्व आमदारांनी सहकार्य करावं अशी अपेक्षा विधान परिषदेचे सभापती रामराजे निंबाळकर यांनी व्यक्त केली आहे. विधीमंडळ दहशतवाद्यांच्या हिटलिस्टवर असल्यानं तपासणी दरम्यान सहकार्य करण्याचं आवाहन निंबाळकरांनी यावेळी सर्व आमदारांना केलं.