मुंबई : शहरातील अंधेरी पूल दुर्घटनेनंतर मुंबईकरांमध्ये, भीतीचं वातावरण पसरलं होतं. या पार्श्वभूमीवर खबरदारीचा उपाय म्हणून, मोडकळीला आलेला वांद्रे आणि माहीम दरम्यानचा वाहतूक पूल बंद करण्याचे आदेश रेल्वे प्रशासनानं दिले आहेत.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

दरम्यान, ३ जुलै रोजी अंधेरीतील गोखले पुलाचा काही भाग कोसळला होता. या दुर्घटनेत पाच जण जखमी झाले होते. तसेच पश्चिम रेल्वेची वाहतूक विस्कळीत झाली होती. तर दुर्घटनेत जखमी झालेल्या अस्मिता काटकर यांना कूपर रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. शुक्रवारी काटकर यांची प्रकृती आणखी ढासळल्यानं त्यांना अतिदक्षता विभागात हलवण्यात आलं. मात्र अखेर त्यांची मृत्यूशी सुरु असलेली झुंज अखेर अपयशी ठरली. 



गतवर्षी परळ - एल्फिस्टन पूल चेंगराचेंगरीत अनेकांना जीव गमवावा लागला होता. तसेच अनेक जण  जखमी झाले होते. त्यानंतर या ठिकाणी लष्कराच्या मदतीने पूल उभारण्यात आले. तर परळ येथे नवीन प्लॅटफॉर्म बांधला. या ठिकाणचा अरुंद पुलाचा प्रश्न मार्गी लागलाय. त्यामुळे अंधेरी दुर्घटनेनंतर धोकादायक पूलांचा पाहणी करण्यात येणार आहे.