वाशी - ठाणे ट्रान्स हार्बर रेल्वे मार्गावर ओव्हरहेड वायर तुटल्याने दोन्ही मार्गावरील रेल्वे बंद वाहतूक बंद झाली आहे. तुर्भे रेल्वे स्थानकाजवळ ओव्हरहेड वायर तुटली आहे. वायर जोडण्याचे काम सुरू आहे. जवळपास ३ तासांपासून वाहतूक ठप्प आहे. ठाण्याहून वाशीला जाणाऱ्या मार्गावरील लोकल ठप्प झाल्या आहेत.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

ओव्हरहेड वायर दुरूस्तीचे काम सुरू आहे. मात्र सकाळीच लोकल ठप्प झाल्याने चाकरमान्यांना त्रास सहन करावा लागत आहे. ओव्हरहेड वायरच्या दुरुस्तीचे काम लवकरच पूर्ण होईल असे रेल्वे प्रशासनाकडून सांगण्यात आले आहे. कामाच्या ठिकाणी पोहचण्यासाठी प्रवाशांनी थेट रेल्वे  रुळावरून चालत जाण्याचा मार्ग निवडला आहे.