मुंबईसह उपनगरात रात्रभर मुसळधार पाऊस
मुंबई शहर आणि उपनगरात रात्रभर मुसळधार पाऊस बरसत असून अधूनमधून पावसाच्या जोरदार सरी कोसळत आहेत.
मुंबई : शहर आणि उपनगरात रात्रभर मुसळधार पाऊस बरसला. त्यामुळे सखल भागात पाणी साचले असून जनजीवन विस्कळीत झाल आहे. मुंबईतल्या किंग्स सर्कल आणि शीव परिसरात रस्त्यावर पाणी साचले होते. दरम्यान, सकाळी मुंबईत पावसाने थोडी विश्रांती घेतली. सोमवारपासून पावसाची संततधार सतत सुरू आहे. मात्र अधूनमधून पावसाच्या जोरदार सरी कोसळत आहेत.
मुंबईसह, नवी मुंबई, ठाणे, कल्याण, डोंबिवली, भिवंडी परिसरातही रात्रभर जोरदार पाऊस झाला. पुण्यातही पावसाची संततधार सुरुच आहे. काल संध्याकाळपासून जोरदार पाऊस पुण्यात बरसत आहे. धरणक्षेत्रातही दमदार पाऊस झाला झाले. दरम्यान येत्या ३६ तासांमध्ये मुंबईसह कोकण, पश्चिम महाराष्ट्र, विदर्भात मुसळधार पाऊस पडणार असल्याचा अंदाज हवामान विभागाने व्यक्त केला आहे.
दरम्यान, शीव परिसरातील गणेश मंडळांमध्ये देखील पाणी शिरल होते. पावसाने थोडी विश्रांती घेतल्याने पाण्याचा निचरा झाला आहे. तसेच संध्याकाळी पावसामुळे रेल्वे सेवा उशिराने धावत होती. तर सायन, कुर्ला या ठिकाणी पाणी साचण्यास सुरुवात झाली होती. मात्र, पाण्याचा निचरा झाल्याने त्याचा फारसा परिणाम रेल्वेसेवेवर झाला नाही.