यंदा `आवाजाशिवाय` गोविंदा साजरा होणार?
आजपर्यंत विविध प्रकारचे बंद आपण पाहिले असतील पण येत्या १५ ऑगस्टला महाराष्ट्रात होणार आहे लाऊड स्पीकर बंद आंदोलन...
देवेंद्र कोल्हटकर, झी मीडिया, मुंबई : आजपर्यंत विविध प्रकारचे बंद आपण पाहिले असतील पण येत्या १५ ऑगस्टला महाराष्ट्रात होणार आहे लाऊड स्पीकर बंद आंदोलन...
येत्या १५ ऑगस्टला असणाऱ्या दही हंडीला गोविंदांना आवडणारी आणि त्यांचा उत्साह वाढवणारी अशी गाणी डीजेवर वाजणार नाहीत... कारण महाराष्ट्र भरातील साऊंड ऑपरेटर्स १५ ऑगस्टला एक दिवसाचा बंद पुकारणार आहेत. साऊंड सिस्टिम लावण्यासाठी मिळवाव्या लागणाऱ्या परवानगीसाठी येणाऱ्या अडचणी, पोलिसांकडून दिला जाणारा त्रास तसेच ६५ डेसीबल ही जी आवाजाची सध्या मर्यादा आहे ती वाढवून मिळावी या मागणीला लाऊड स्पीकर बंद दिवस पाळला जाणार आहे.
प्रोफेशनल ऑडीओ अॅन्ड लाईटनिंग असोसिएशन अर्थात PALA ही साऊंड आणि लाईट ्यवसायात काम करणाऱ्यांची संघटना आहे. या संघटनेच्या माध्यमातून हा बंद पाळला जाणार आहे.या व्यवसायात महाराष्ट्रात दीड लाखाहून अधिक लोक अवलंबून आहेत.यांच्या मागण्या बद्दल काही सरकारी पातळी वरून काही सकारात्मक निर्णय झाला नाही तर गणेशत्सवात देखील लाऊड स्पीकर बंद आंदोलन सुरु ठेवण्याचा इशारा देण्यात आलाय.
राजकीय वरदहस्त असलेल्या कार्यक्रंमांना पोलीस अडचणी येऊन देत नाहीत. मग सर्व सामान्य ठिकाणी कायदायाचा बडगा का उगारला जातो? असा सवाल साऊंड व्यावसायिकांनी केलाय. कामगार आणि मालक यांना अनेक अडचणींचा सामना करावा लागतोय. या सगळ्या मुद्द्याला वाचा फोडण्यासाठी PALA ला बंदचं हत्यार उपसावं लागलंय. आता यातून काय सिद्ध होतंय याकडे सा-यांचं लक्ष लागलंय.