मुंबई : कोरोनाचा प्रादुर्भाव राज्यात वाढत आहे. आतापर्यंत ४४८३ कोरोनाबाधित रूग्ण राज्यात सापडले आहेत. असं असताना २० एप्रिल रोजी काही प्रमाणात शिथिलता निर्माण करण्यात आली. मात्र आता बंधन नसल्यासारखे लोक वागत आहेत. यावर आज मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी जनतेशी संवाद साधला. 


पालघर तिहेरी हत्याकांडावर काय म्हणाले मुख्यमंत्री? 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

पालघरसारखी घटना पुन्हा होऊ नये अशी माहिती मुख्यमंत्र्यांनी यावेळी दिली. सरकार या प्रकरणावर शांत बसलेलं नाही. पालघरप्रकरणी मॉब लिचिंगचा प्रकार निंदनीय आहे. या घटने प्रकरणी पाच महत्वाच्या आरोपींना अटक करण्यात आलं आहे. कुणीही या प्रकरणात धार्मिक कारण शोधू नये. अमित शाह,योगी आदित्यनाथांशी पालघर तिहेरी हत्याकांडाबाबत चर्चा झाली आहे. 


गुन्हेगाऱ्यांवर कठोर कारवाई होणार आहे. ५ प्रमुख आरोपींना ताब्यात घेतलं आहे. तसेच १०० हून अधिक लोकांना देखीत ताब्यात घेतलं आहे. हे प्रकरण दादरा नगर हवेली येथे घडली आहे. दुर्गम परिसरात हे हत्याकांड घटलं आहे. पालघर प्रकरणात मॉब लिचिंगच प्रकरण अतिशय निंदनीय आहे. 


पालघर प्रकरण आता सीआयडीकडे देण्यात आलं आहे. या प्रकरणाची कसून चौकशी होणार असून दोन पोलिसांना निलंबित केलं असून आनंदराव काळे, सुधीर काटारे अशी त्यांची नावे आहेत. 
हा दोन धर्मांतला संघर्ष नाही त्यामुळे सरकारवर आरोप करण चुकीचं  आहे. सरकार या प्रकरणाची चौकशी करत आहे. सरकार शांत बसलेलं नाही. त्यामुळे कुणीही या प्रकरणात आग लावू नका. ही घटना फक्त गैरसमजातून झाली आहे. पण कुणालाही याबाबत सोडणार नाही.  


 



२०एप्रिल रोजी रस्त्यावर गर्दी


संकट टळलेलं नाही,लॉकडाऊन संपलेला नाही, रुतलेलं अर्थचक्र पुन्हा हळू सुरु करत आहोत, ग्रीन आणि ऑरेंज झोनमध्ये शिथिलता दिली आहे . गेल्या ३६ तासांत राज्यात ८३५ नवे रूग्ण पॉझिटिव्ह .लॉकडाऊन लवकर कसं संपेल हे आपल्याच हातात आहे, संकट टळलंय या भ्रमात कुणीही राहू नका. 


महाराष्ट्रात कोरोना वाढत असल्यामुळे केंद्राची समिती दाखल करण्यात आली आहे. समिती राज्यातून आढावा घेणार आहे. गेल्या १२ तासांत कोरोनाचे २८३ रूग्ण वाढले आहेत. तर फक्त मुंबईत कोरोनाचे गेल्या १२ तासांत १८७ रूग्ण वाढले आहेत.