Paper Cups : एखादा समारंभ असो किंवा मग एखाद्या चहा- कॉफीच्या टपरीवर जाणं असो. तिथं गेलं असता चहा किंव कॉफी, अगदी शीतपेयसुद्धा कागदी कपातून/ ग्लासातून दिली जातात. पण, येत्या काही दिवसांमध्ये हेच कागदी कप कालबाह्य होणार असल्याचं म्हटलं जात आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

थोडक्यात आता काचेच्या कपातच चहा मिळणार असून, कागदी आणि प्लास्टिक कपच्या वापरावर बंदी येणार आहे. खुद्द राज्याचे आरोग्य मंत्री प्रकाश आबिटकर यांनी यासंदर्भातील संकेत दिले आहेत. आरोग्य आणि पर्यावरण विभागामार्फत पेपर, प्लास्टिक कप बंदीबाबत जनजागृती केली जाणार असल्याची माहिती आबिटकरांनी दिली. आधीपासूनच या कपांवर बंदी आहे मात्र कोणी जर त्याचा वापर करत असेल आरोग्य, पर्यावरण विभाग त्याबाबत जनजागृती करेल असंही आरोग्य मंत्र्यांनी स्पष्ट केलं आहे. 


बुलडाण्यात कपांवर बंदीचे निर्देश लागू 


कागदी कप वापरास सोपे आणि ते स्वच्छ करण्यास लागणारी मेहनत कमी, किंबहुना ते वापरून टाकून देण्याजोगे असल्यामुळं इथं स्वच्छतेचा मुद्दाच येत नसल्यानं अनेकांनीच या कागदी कपांना प्राधान्य दिलं होतं. पण, हे कप आरोग्यास घातक असल्यानं बुलडाणा जिल्ह्याधिकारी कार्यालयाकडून या कपांवर बंदी घालण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. 


हेसुद्धा वाचा : Maharashtra Weather News : हवामान बदलानं वाढवली मुंबईकरांची चिंता; पुढील 24 तासांत राज्यात असं काय होणार आहे? 


 


हे कप तयार करताना त्यात बीपीए नावाचं रसायन वापरलं जात असून, हे रसायन आरोग्यास घातक असल्याचा दावा केला जात आहे. इतकंच नव्हे, तर या रसायनातून कॅन्सरचा धोकाही संभवतो. ज्यामुळं या कपांवर बंदी घालण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.