प्रशांत अंकुशराव, झी २४ तास, मुंबई : दहावी आणि बारावीच्या मुलांमध्ये गैरसमज पसरवणे, त्यांना ऑफलाईन परीक्षा देऊ नका म्हणून चिथवणे आणि त्यांना वांद्रे येथे बेकायदेशीर पद्धतीने जमा करणे, या प्रकरणी हिंदुस्थानी भाऊला पोलिसांनी ताब्यात घेतलं होतं. यानंतर हिंदुस्थानी भाऊला दहावीतील विद्यार्थ्यांचे पालक पोलिसांसमोरच भेटले. १० लाखावर फॉलोअर्स असलेल्या या हिंदुस्थानी भाऊला पालकांनी टपा टप, टपा, एकानंतर एकाने झापला.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

पालकांनी ज्या प्रकारे छापलं ते पाहून हिंदुस्थानी भाऊ चांगला लाल झाला, कारण कोणता पालक कधीही मारु शकतो अशी त्याला भीती वाटू लागली. काही पालकांनी तर त्याला थेट सांगितलं, 'तू सातवी शिकलेला आणि दहावीच्या विद्यार्थ्यांना काय सल्ले देतो, परीक्षा घेऊ नका, देऊ नका, ऑनलाईन परीक्षा घ्या, काही कळते का तुला?''


पालक पुढे म्हणाले, 'आमच्या मुलांचं भवितव्य घडवण्यासाठी आम्ही काय काय करतो आणि तू त्यांना काय हे सल्ले देतो, मुलांचा लिहिण्याचा स्पीड कमी झाला आहे, म्हणतो, कोरोना काळात जर एखादा विद्यार्थी २ वर्षापासून पबजी खेळत असेल तर त्याला कुठून येणार स्पीड. जे मुलं कागदावर काही लिहू शकली नाहीत, ते ऑनलाईन परीक्षा देताना कॉम्प्युटरवर टायपिंग तरी कसं करतील, ते देखील देवनागरीत.''