मुंबई :  पारशी धर्मीयांच्या नववर्षाचा आज पहिला दिवस आहे. नववर्ष निमित्तानं पारशी धर्मीय अग्यारीमध्ये जाऊन प्रार्थना करुन आशिर्वाद घेतात. पारशी समाजाच्या पारंपरिक कॅलेंडरनुसार वर्षाचा शेवटचा दिवस हा पतेती म्हणून ओळखला जातो. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

या दिवशी पारशी धर्मीय सरत्या वर्षातल्या कडूगोड आठवणी आणि कृत्यांचं स्मरण करतात. तसंच घडलेल्या चुकांबद्दल माफी मागतात. तर नवरोझ या पारशी वर्षाच्या पहिल्या दिवशी उत्साह आणि सकारात्मकतेनं पारशी धर्मीय शुभारंभ करतात. 


इस्रायल कॅलेंडर प्रमाणे वर्षाच्या ह्या पहिल्या दिवसाला 'नवरोज' म्हटले जाते. नवरोजचा अर्थ जणू सृष्टी नवीन हिरवा शेला अंगावर पांघरुन स्वागताला उभी आहे. ह्या दिवशी अग्यारीत जाऊन प्रार्थना म्हटल्या जातात आणि खास पारशी भोजनाचा पात्रानू मच्छी, धनसाक, चिकन फर्चा, सली मूर्गी सारख्या पदार्थांचा आस्वाद घेतला जातो.