मुंबई : Coronavirus in  Maharashtra : महाराष्ट्र राज्यात गेल्या चार महिन्यात लस न मिळालेल्यांचे मृत्यू अधिक झाले आहेत. कोरोनाने (Coronavirus) जे मृत्यू झाले त्यातल्या 94 टक्के नागरिकांनी लसच घेतलेली नव्हती. (Corona Vaccination) त्यामुळे लसीचे महत्त्व अधोरेखित झाले आहे. तर कोरोनाग्रस्तांपैकी 87 टक्के नागरिकांनी व्हॅक्सिनेशनसाठी (Vaccination) टाळाटाळ केली, असेही पुढे आले आहे. ही आकडेवारी वैद्यकीय शिक्षण विभागाच्या अभ्यासातून उघड झाली आहे.


लसीकरण किती गरजेचे?


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

कोरोना लस घेतल्यानंतरही मृत्यू झालेल्या रुग्णांचे विश्लेषण  वैद्यकीय शिक्षण विभागाने केले. त्यानंतर ही बाबपुढे आली आहे. मृत्यू झालेल्या रुग्णांपैकी 94 टक्के रुग्णांनी लस घेतली नव्हती. यामुळे मृत्यू आणि रुग्णसंख्या आटोक्यात आणण्यासाठी वेगाने लसीकरण किती गरजेचे आहे, हे  स्पष्ट झाले आहे. या अभ्यासात राज्यात 11 मे ते 22 ऑगस्ट 2021 या काळात मृत्यू झालेल्या आणि रुग्णालयात दाखल झालेल्या रुग्णांचा आढावा घेण्यात आला. 


गेल्या चार महिन्यात शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात दाखल झालेल्या 18 हजार 592 रुग्णांपैकी 5725 रुग्णांचा मृत्यू झाला आहे.  मृत्यू झालेल्या रुग्णांपैकी 94 टक्के रुग्णांनी लस घेतली नव्हती तर सुमारे 6 टक्के रुग्णांनी लस घेतली होती. रुग्णालयात दाखल झालेल्यापैकी 16 हजार 180 रुग्णांनी लशीची एकही डोस घेतलेला नव्हता. लस न घेतलेल्या रुग्णांपैकी सुमारे 33 टक्के रुग्णांचा मृत्यू  झाला आहे, तर लस घेतलेल्यांमध्ये मृत्यूचे प्रमाण सुमारे 13 टक्के आढळून आलेय.


दोन डोस घेतल्यानंतर काय...


कोरोना लस घेतल्यानंतरही मृत्यू झालेल्या 126 रुग्णांचे विश्लेषण  वैद्यकीय शिक्षण विभागाने केले. यातील 88 टक्के रुग्णांनी कोरोना लसीचा डोस घेतला होता.  तर सुमारे 12 टक्के रुग्णांनी दुसरा डोस पूर्ण केला होता. दोन्ही डोस पूर्ण केलेल्यांमध्ये मृत्यूचे प्रमाण कमी असल्याचे आढळले आहे.  लस घेतल्यानंतरही मृत्यू झालेल्या रुग्णांमध्ये 68 टक्के रुग्ण हे 60 वर्षावरील होते, तर 63 टक्के रुग्णांना दीर्घकालीन आजार होते.


लस घेतलेल्या 2270 रुग्णांचेही विश्लेषण विभागाने केले. यात एक डोस घेतल्यानंतरही 74 टक्के रुग्णांना कोरोना झाला. तर दुसरा डोस घेतलेल्यांमध्ये मात्र हे प्रमाण केवळ 25 टक्के आहे. कोरोना लस घेतले आणि कोविड नियमांचे पालन केल्यास ही साथ आटोक्यात आणण्यात यश येईल, असे मत वैद्यकीय शिक्षण आणि संचलनालयाचे सचिव डॉ. सौरभ विजय यांनी व्यक्त केले.