११५००,००,०००,००० रुपयांचा अपहार... पाहा, घोटाळ्याचा `नीरव मोदी` पॅटर्न
पंजाब नॅशनल बँकेतील नीरव मोदी घोटाळा प्रकरणानं अवघ्या देशाला हादरवून सोडलंय. पण, हा तब्बल ११ हजार ५०० कोटींचा भ्रष्टाचार कोंटींचा भ्रष्टाचार नेमका झाला तरी कसा? आणि तो उघडकीस कसा आला? चला पाहुयात...
मुंबई : पंजाब नॅशनल बँकेतील नीरव मोदी घोटाळा प्रकरणानं अवघ्या देशाला हादरवून सोडलंय. पण, हा तब्बल ११ हजार ५०० कोटींचा भ्रष्टाचार कोंटींचा भ्रष्टाचार नेमका झाला तरी कसा? आणि तो उघडकीस कसा आला? चला पाहुयात...
'पीएनबी'तून कसे गेले ११,५०० कोटी?
- नीरव मोदी हा देशातील बड्या वर्तुळात फिरणारा हिरा व्यापारी... नीरव मोदीनं मामा मेहुल चोकसी यांनी तीन कंपन्या स्थापन केल्या
- डायमंड आरएस, सोलर एक्सपोर्ट, स्टेलर डायमंडस अशी त्याच्या हिरा कंपन्यांची नावं
- तीन कंपन्यांनी हाँगकाँगमधून माल आयात करण्यासाठी लेटर ऑफ अंडरटेकिंग मिळवली
अधिक वाचा : नीरव मोदीच्या मालकीच्या ९ ठिकाणी छापे
- 'लेटर ऑफ अंडरटेकिंग'च्या मदतीनं हाँगकाँगमधील अलाहाबाद बँक, अॅक्सिस बँकेतून पैसे मिळवले
- प्रत्यक्षात मात्र 'लेटर ऑफ अंडरटेकिंग'साठी आवश्यक रक्कम पंजाब नॅशनल बँकेत भरलीच नव्हती
- पंजाब नॅशनल बँकेनं १७ जानेवारीला सीबीआयकडे गुन्हा दाखल करून अपहाराच्या चौकशीची मागणी केली
अधिक वाचा : 'पीएनबी'च्या मुंबई फोर्ट शाखेत ११ हजार ५०० कोटींचा भ्रष्टाचार
- २६ जानेवारीला झालेल्या २८० कोटी रुपयांच्या व्यवहाराचा बँकेच्या तक्रारीत उल्लेख
- नीरव मोदी, त्याची पत्नी आमी मोदी, भाऊ निशल आणि मेहुल चोकसी यांच्यावर गुन्हा दाखल
अधिक वाचा : 'पीएनबीनं'च उघड केला नीरव मोदीचा अपहार
- २०१० मध्ये तीन कंपन्यांसाठी प्रथम 'लेटर ऑफ अंडरटेकिंग' देण्यात आलं, पण त्यासाठी पैसे घेतले नाही
- आता २०१० पासून सुरू असलेल्या या व्यवहाराची चौकशी सुरू
'लेटर ऑफ अंडरटेकिंग' म्हणजे काय?
- लेटर ऑफ अंडरटेकिंग म्हणजे एकप्रकारे खातेदाराच्या वतीनं पैसे चुकते करण्याची बँकेनं घेतलेली हमी
- यासाठी खातेदाराला जेवढ्या रक्कमेची हमी हवी आहे तेवढी रक्कम खात्यात ठेवणं बंधणकारक असतं
- पंजाब नॅशनल बँकेच्या अपहारात लेटर ऑफ अंडरटेकिंग देताना खात्यात पैसे जमान आहेत की नाही याची खात्री करून घेण्यात आली नाही
अधिक वाचा : हिरा व्यापारी नीरव मोदी फरार घोषित
- पहिलं 'लेटर ऑफ अंडरटेकिंग' मार्च २०१० मध्ये देण्यात आलं.
- नीरव मोदी अपहार प्रकरण समोर आल्यानंतर त्यावेळचे बँकेचे उपव्यवस्थापक गोकूलनाथ शेट्टी आणि त्याचे सहकारी मनोज खरात यांनी 'लेटर ऑफ अंडरटेकिंग' जारी करताना रिझर्व्ह बँकेनं घालून दिलेल्या नियमांची सपशेल पायमल्ली केल्याचं उघड झालंय.