ब्रेड, पाव महागला, नाश्ता झाला महाग
ब्रेड आणि पाव आता महाग होणार आहे.
मुंबई : ब्रेड आणि पाव आता महाग होणार आहे. क्वालिटी कंपनीच्या ब्राऊन ब्रेडचा भाव दोन दिवसांपूर्वीच ३३ रुपयांवरून ३५ रुपये झाला आहे. त्यामुळे सकाळचा नास्ता महाग होणार आहे.
ब्रिटानिया कंपनीच्या ब्रेडचे ही भाव वाढल्यामुळे २ रुपयांचा भार सामान्यांच्या खिशाला पडणार आहे. शनिवारपासून कंपनीचे ब्रेड किंवा लादी पाव देखील महाग होण्याचे संकेत मिळत आहे. या भाववाढीमागे मैद्याचे वाढत असलेले भाव आणि प्लास्टिक बंदी ही मुख्य कारणे, असल्याचे सांगितले जात आहे.