मुंबई: एकीकडे पेट्रोल डिझेलचे दर अक्षरशः कंबरडं मोडत आहेत. मात्र दुसरीकडे राज्यात सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेने प्रवास करणाऱ्या प्रवाशांची टक्केवारी चिंताजनकरित्या घसरत आहे. खासगी वाहन खरेदीचे प्रमाण वाढत आहे. 
 
 याचा परिणाम म्हणजे सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेतली प्रवाशांची टक्केवारी निचांकी पातळीवर पोहोचली आहे. २०१८ या वर्षात सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेने प्रवास करणाऱ्यांची टक्केवारी अवघी २५ ते ३५ टक्क्यांवर आली. मात्र, याला या व्यवस्थांचा अत्यंत ढिसाळ कारभार जबाबदार आहे. 
 
 गेल्या चार वर्षात मुंबईत बेस्टच्या बसेसची संख्या अजिबात वाढलेली नाही. मात्र, दुचाकींची संख्या १३.९ कोटींवरून १८.६ कोटींवर गेली आहे. चारचाकींची संख्या २.६ कोटींवरून ३.३ कोटींवर पोहोचल्याची माहिती समोर आली आहे.