मुंबई : राज्यातील कायदा-सुवव्यस्था बिघडवण्यासाठी इतर राज्यातून काही लोकं महाराष्ट्रात दाखल झाल्याची माहिती गृहविभागाने दिली आहे. राज्यात गेल्या काही दिवसांपासून तणावाचं वातावरण आहे. राज ठाकरे यांनी भोंग्याचा मुद्दा उपस्थित केल्यानंतर तणाव आणखी वाढला आहे. याआधी एसटी कामगारांचं आंदोलन असो, नवनीत राणा यांनी हनुमान चालिसा पठण करण्याच्या उद्धव ठाकरे यांना दिलेलं आव्हान असो. यामुळे राज्यात काही प्रमाणात तणाव वाढला आहे.



COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

राज ठाकरे यांनी 3 मे पर्यंत भोंगे काढण्यासाठी अल्टिमेटम दिला आहे. राज्य सरकारने लवकरात लवकर अनधिकृत भोंगे उतरवावे अशी मागणी राज ठाकरे यांनी केली आहे. जर भोंगे काढले नाही तर त्यासमोर मोठ्या आवाजात हनुमान चालिसा लावू असा इशारा राज ठाकरे यांनी दिला आहे.



महाराष्ट्राच्या गृहमंत्र्यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना राज्यातील कायदा आणि सुव्यवस्थेची माहिती दिली. पोलिसांनी कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी सर्व उपाययोजना कराव्यात आणि कोणाच्या आदेशाची वाट पाहू नये, असे आदेश मुख्यमंत्र्यांनी दिले आहेत. महाराष्ट्राचे डीजीपी आणि मुख्यमंत्र्यांनी दूरध्वनीवरून संभाषण केले, कायदा आणि सुव्यवस्थेबाबत चर्चा झाली.