मुंबई: केंद्र व राज्य सरकारच्या हस्तक्षेपामुळे काही दिवसांपूर्वीच कमी झालेल्या पेट्रोल-डिझेलच्या दराने पुन्हा उलटा प्रवास सुरु केला आहे. गुरुवारी मध्यरात्रीपासून मुंबईत पेट्रोल व डिझेलचे दर पुन्हा वाढले. पेट्रोल १२ तर डिझेल २९ पैशांनी महागले. त्यामुळे आता पेट्रोल व डिझेलची किंमत अनुक्रमे ८७.९४ आणि ७८.५१ इतकी झाली आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

तत्पूर्वी गुरुवारी देखील पेट्रोल आणि डिझेलच्या दरात अनुक्रमे ९ पैसे व २९ पैशांची वाढ झाली होती. 


सरकारने तेल कंपन्यांवर डिझेल आणि पेट्रोल एका रुपयाने कमी करण्याची जबाबदारी टाकली आहे. सरकारने एक्साइज ड्युटीमध्ये १.५० रुपयांनी कपात केली आहे.