Petrol Diesel Price to Decline : येत्या काही दिवसांत पेट्रोल डिझेलचे दर (Petrol Diesel Price) आणखी कमी होऊ शकतात. कारण कच्च्या तेलाच्या (Crude Oil) किमतीत मोठी घसरण होऊ शकते. केंद्र सरकारने आपल्या राखून ठेवलेल्या तेलाच्या साठ्यातून (Strategic oil reserve) 50 लाख बॅरल कच्चे तेल बाजारात विकण्याचा निर्णय घेतला आहे. सरकारच्या या निर्णयामुळे कच्च्या तेलाच्या किमती कमी होण्याची अपेक्षा आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, भारताकडे 38 दशलक्ष बॅरल कच्च्या तेलाचे राखीव साठे आहेत, जे देशाच्या पूर्व आणि पश्चिम किनारपट्टी भागात जमिनीखाली साठवले जातात. त्यापैकी 5 दशलक्ष बॅरल तेल येत्या 7 ते 10 दिवसांत बाजारात आणलं जाणार आहे. याआधी अमेरिका, जपान आणि इतर काही देशांनीही कच्च्या तेलाच्या वाढत्या किमती लक्षात घेऊन त्यांच्या राखीव साठ्यातून कच्चे तेल बाजारात विकण्याचा निर्णय घेतला आहे. या देशांच्या या निर्णयानंतर कच्च्या तेलाच्या वाढत्या किमतीलाही आळा बसला आहे.



केंद्र सरकार आपल्या Strategic Reserve मध्ये साठवलेले हे कच्चे तेल मंगलोर रिफाइनरी अँड पेट्रोकेमिकल्स लिमिटेड (MRPL) आणि हिंदुस्तान पेट्रोलियम कॉरपोरेशन लिमिटेडला (HPCL) विकणार आहे.


आणखी गरज भासल्यास सरकार या राखीव साठ्यातून अधिक कच्चे तेल बाजारात विकू शकते, जेणेकरून सर्वसामान्यांना महागड्या इंधनाच्या दरातून दिलासा मिळू शकेल, असे संकेत सरकारने दिले आहेत.