Petrol-Diesel Price Today! खरंच पेट्रोल-डिझेच्या किंमतीत घट होतेय? जाणून घ्या आजची किंमत
येत्या काही दिवसात पेट्रोल-डिझेलच्या किंमतींमध्ये आणखी घट झाल्याचे दिसू शकते.
मुंबई : देशातील पेट्रोलियम कंपन्यांनी सलग 14 व्या दिवशीदेखील पेट्रोल-डिझेलच्या किंमतींमध्ये बदल करण्याचा निर्णय घेतला आहे. आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाच्या किंमतींमध्ये घसरण सध्या दिसून येत आहे. त्याचा तुम्हाला नक्की फायदा होऊ शकतो. येत्या काही दिवसात पेट्रोल-डिझेलच्या किंमतींमध्ये आणखी घट झाल्याचे दिसू शकते. आज मुंबईतील पेट्रोलचे दर 96.98 रुपये इतके आहेत. तर डिझेलचे दर 87.96 रुपये इतके आहेत.
पेट्रोल डिझेच्या किंमती कशा ठरतात?
पेट्रोल-डिझेलच्या किंमतींमध्ये सकाळी 6 वाजता बदल होतात. या किंमतींमध्ये एक्साइज ड्युटी, डीलर कमीशन आणि इतर टॅक्स जोडल्यानंतर त्याची किंमत दुप्पट होते. सोबतच आंतरराष्ट्रीय बाजारात तेलाचे दर काय आहेत. त्यानुसार किंमती कमी जास्त केल्या जातात.
पेट्रोल-डिझेलच्याच्या किंमती कशा पाहायच्या?
तुम्हाला पेट्रोल-डिझेलच्या सध्याच्या किंमती जाणून घ्यायच्या असतील. तर SMS करून माहिती घेता येईल
इंडियन ऑईल मुंबईकरीता
RSP 108412 (RSP <space>Dealer Code of Petrol Pump)
हा मॅसेज 9224992249 या क्रमांकावर पाठवा. तुम्हाला लगेचच मुंबईतील सध्याच्या पेट्रोल - डिझेच्या किंमती काय आहेत याबाबत माहिती मिळेल.