मुंबईकरांना दिलासा नाहीच! घरगुती सिलिंडरपाठोपाठ पेट्रोलचे दर भडकले
वाढत्या पेट्रोलच्या दरामुळे सर्वसामान्यांच्या खिशाला चांगलीच झळ बसत आहे.
मुंबई: 2021च्या सुरुवातीपासूनच पेट्रोल-डिझेलच्या दरात वाढ होत आहे. येत्या दिवसात पेट्रोल शंभरी गाठणार अशी भीती असताना आज राजधानी दिल्लीत पेट्रोलचे दर स्थिरावले. तर दुसरीकडे डिझेलच्या दरात झपाट्यानं वाढ होत आहे. मुंबईमध्ये 37 पैशांनी पेट्रोल वाढलं आहे. वाढत्या पेट्रोलच्या दरामुळे सर्वसामान्यांच्या खिशाला चांगलीच झळ बसत आहे.
एलपीजी सिलिंडरच्या किंमती फेब्रुवारीमध्ये 100 रुपयांनी वाढल्या आहेत, ही या महिन्यातील तिसरी वाढ आहे. मंगळवारी पेट्रोल डिझेलचे दर वाढले. त्यानंतर राजधानी दिल्लीत जरी ते स्थिरावले असले तरी इतर ठिकाणी काही प्रमाणात ही दरवाढ सुरू आहे. 66 डॉलर प्रति बॅरल सध्या कच्च्या तेलाचे दर असल्यानं पेट्रोल आणि डिझेलचे दर गगनाला भिडले आहेत.
दिल्लीत पेट्रोल 91 रुपयांच्या अगदी जवळ पोहोचले आहे. जर किंमती अशाच प्रकारे वाढत राहिल्या तर काही दिवसांतच मुंबईत पेट्रोलचे दर 100 रुपयांवर पोचतील. मुंबईत आज पेट्रोलचे दर 97 रुपयांहून अधिक आहेत. तर कोलकातामध्ये पेट्रोल आणि डिझेलचे दर घसरले आहेत.
पेट्रोल डिझेल 9 फेब्रुवारीपासून सलग 12 दिवस महाग झालं होतं. दिल्लीमध्ये मागच्या आठवड्यात डिझेल 81. 94 रुपये प्रति लिटर दर होता. तर पेट्रोलसाठी नागरिकांना 80.43 रुपये मोजावे लागत होते. आता या आठवड्याचा विकेण्डला दर जरी स्थित असले तरी मुंबईत मात्र पेट्रोल-डिझेलच्या दरवाढीचा भडका उडाला आहे. काय आहेत आजचे दर जाणून घ्या.
राज्य कालचे दर आजचे दर
दिल्ली- 90.58 90.93
मुंबई- 97.00 97.34
कोलकाता- 91.78 91.12
चेन्नई- 92.59 92.90