मुंबई : सात देशी पिस्तूल, दोन जिवंत काडतूकसह मध्यप्रदेशहून रेल्वेने आलेल्या दोघांना भाईंदर येथे अटक करण्यात आली आहे. पिस्तूल विक्री करण्यासाठी हे दोघे आले होते. त्यांना नवघर पोलिसांनी अटक केली आहे. राहुल कण्हैयालाल मालविया आणि ईश्वर रमेश कुमार अशी त्यांची नावे आहेत. मध्यप्रदेशमधील नलछेडा परिसरात हे दोघे राहणारे आहेत. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

भाईंदर पोलिसांना हे आरोपी पिस्तूल विक्रीसाठी बंदरपाडा परिसरात येणार असल्याची गुप्त माहिती मिळाली होती. या माहितीच्या आधारे पोलिसांनी नजर ठेवली. या दोघांना आज दुपारी अटक केली. या दोघांकडून जप्त करण्यात आलेली सात देशी पिस्तुले आणि दोन जिवंत काडतूसे ताब्यात घेतली. याची बाजार भावानुसार किंमत सुमारे एक लाख ७५ हजार रुपये इतकी आहे, अशी माहिती भाईंदरचे सहाय्यक पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी यांनी दिली.


या दोघांवर शस्त्रबाळगल्याप्रकरणी कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. संपूर्ण राज्यात निवडणुकीच्या पाश्वभूमीवर पोलिसांचा कडेकोट बंदोबस्त आसताना देखील हे दोन आरोपी मध्यप्रदेश येथून पिस्तूल विक्रीसाठी भाईंदरपर्यंत पोहोचले, असल्याने आश्चर्य व्यक्त होत आहे.