`पर्यावरण पूरक` संदेश देणारे `कॅरी ऑन`चे व्हिडिओ व्हायरल
``Carry On`...`या टॅग खाली महत्वाचा संदेश सुमित आणि त्याच्या टीमने दिला आहे.
मुंबई : प्लास्टिकचा प्रश्न हाहा करुन आपल्यासमोर उभा ठाकलाय. नुकत्याच झालेल्या प्लास्टक पिशव्या बंदीच्या घोषणेनंतर प्रमाण काही फरकाने कमी होईल. पण प्लास्टिक पिशव्यांना बंदी आणली तर त्याला पूरक वस्तू बाजारात येण गरजेच आहे. या वस्तू प्लास्टिकप्रमाणे अविघटनशील नसाव्यात हेही तितकच महत्त्वाच. प्लास्टिक पिशव्यांवर बंदी असली तरी गेले कित्येक वर्ष रखडलेला प्लास्टिक बंदी पूर्णपणे अंमलात आणणे कठीणच. सर्वांनी पर्यावरण पूरक जगायचा संकल्प करणे हाच या सर्वावर उपाय ठरेल. कलादिग्दर्शक असलेल्या सुमित पाटील या तरुणाने 'पर्यावरण पूरक'विचार समाजात बिंबवण्यासाठी काही व्हिडिओ तयार केले आहेत. हे व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहेत. '"Carry On"...'या टॅग खाली महत्वाचा संदेश सुमित आणि त्याच्या टीमने दिला आहे.
पर्यावरण पूरकतेचा संदेश
जिमवरुन येणारा मुलगा केळी घेण्यासाठी जातो. पण प्लास्टिक पिशवी बंद असल्याचे त्याच्या लक्षात येते. त्यानंतर क्षणाचाही विलंब न लावता आपल्या बनियनचा वापर तो पिशवी म्हणून करतो. यामध्ये केळी घालून तो आपल्या मार्गी जातो. दुसऱ्या एका व्हिडिओत एक तरुणी भाजी घेण्यासाठी बाजारात जाते.
पिशवी नसल्याचे जाणवताच आपल्याकडील स्कार्फचा पिशवी म्हणून उपयोग करते. जरी प्लास्टिक पिशव्या बंद झाल्या तरी तरुणांनी आपले मार्ग निवडल्याचे या व्हिडिओतून स्पष्ट होतयं.