मुंबई : आज बकरी ईद, त्याग आणि संयमाची शिकवण देणारा सण, देशभरात आज ईद-उल-अजदहा म्हणजेच बकरी ईद साजरी होत आहे. या निमित्त मुस्लीम बांधवांनी मशिदींमध्ये सामुदायिक नमाज अदा केली. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

ईदच्या नमाजानंतर मानव कल्याण, विश्वशांती आणि देशाच्या प्रगतीसाठी प्रार्थना करण्यात आली. प्रेम, त्याग आणि बलिदानाचं प्रतिक म्हणून बकरी ईद साजरी केली जाते. 


दरम्यान पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ट्विटरवरुन देशातील मुस्लिम बांधवांना बकरी ईदच्या शुभेच्छा दिल्या आहेत.