PM Narendra Modi Mumbai Visit : शिंदे सरकार स्थापन झाल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) आज पहिल्यांदाच मुंबईच्या दौऱ्यावर येत आहेत. यावेळी पंतप्रधान मोदी हे मुंबईत एक रोड शो सुद्धा करणार आहेत. 38 हजार कोटींच्या प्रकल्पांचं उदघाटन आणि पायाभरणी करणार आहेत. (Mumbai News in Marathi)  या दौऱ्यासाठी मुंबईतील वाहतुकीत बदल करण्यात आला आहे. संध्याकाळी मुंबईतील बीकेसीवर (BKC) सभा होणार आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

तर दुसरीकडे पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi Mumbai Visit) यांचा कार्यक्रम सुरळीत पार पडावा म्हणून कंबर कसली आहे. नरेंद्र मोदी यांच्या मुंबईत दौऱ्यात मुंबई पोलिसांच्या 900 अधिकाऱ्यांसह साडेचार हजार पोलिसांचा (mumbai police) फौजफाटा तैनात असणार आहे.  तसेच कुठल्याही अफवांवर विश्वास ठेवू नये, असे आवाहनही पोलिसांकडून करण्यात आले आहे. तसेच संपूर्ण परिसरात पंतप्रधानांच्या भेटीदरम्यान ड्रोन, पराग्लाइडर्स तसेच रिमोट कंट्रोल लाईट एअरक्राफ्ट उडवण्यास मनाई करण्यात आली आहे. 


वाचा: बजेटमुळे खिशाला झळ की दिलासा? झटपट चेक करा पेट्रोल-डिझेलचे आजचे दर 


असा असेल पोलिसांचा बंदोबस्त 


मुंबई पोलिस दलातील सर्व वरिष्ठ अधिकाऱ्यांसोबतच पाच पोलिस उपायुक्त यावेळी या परिसरात हजर असणार आहे. त्यांच्या मदतीला 21 ACP 171 पोलिस निरीक्षक आणि 397 इतर अधिकारी हजर असणार आहेत. तसेच या संपूर्ण परिसरात बंदोबस्ताकरिता तब्बल अडीच हजार पोलिस अंमलदार त्यात 600 महिला पोलिस आमदार असतील. या सगळ्यांच्या मदतीला राज्य राखीव पोलिस दलाच्या 4 तुकड्या, दंगस विरोधी पथकाची एक तुकडी तसेच शीघ्र कृती दल देखील हजर असणार आहेत. याबाबत स्वत: मुंबई पोलिस आयुक्त बंदोबस्तावर देखरेख ठेवणार असून त्यांच्या जोडीला CP आणि इतर सह पोलिस आयुक्त देखील असणार आहेत. तसेच मुंबई पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, 900 अधिकाऱ्यांसह 3562 पोलिस कर्मचारी तैनात असणार आहेत.