मुंबईतील अग्नितांडवात गेलेल्या मृतांच्या कुटुंबासाठी राज्य सरकार आणि PM मोदी एकत्र, घेतला मोठा निर्णय
राज्य सरकारसोबत PM मोदींकडूनही मदतीचा हात, मुंबईतील अग्नितांडवात गेलेल्या मृतांच्या कुटुंबासाठी मोठा निर्णय
मुंबई : मुंबईत पुन्हा एकदा अग्नितांडव झाला आहे. ताडदेव परिसराती भाटिया हॉस्पिटलजवळील 20 मजली इमारतीला भीषण आग लागली होती. या आगीत 7 जणांचा होरपळून मृत्यू झाला आहे. तर 12 जण जखमी झाल्याची प्राथमिक माहिती मिळाली होती. आता मुंबईतील अग्नितांडवात गेलेल्या मृतांच्या कुटुंबियांसाठी राज्य सरकार आणि केंद्र सरकारकडून मदत करण्यात येणार आहे.
मुंबईतील आग प्रकरणी राज्य सरकार आणि मोदी सरकार एकत्र येऊन मोठा निर्णय घेतला आहे. राज्य सरकारकडून मृतांच्या कुटुंबियांना 5 लाख रुपयांची तर केंद्र सरकारकडून 2 लाख रुपयांची अतिरिक्त मदत करण्यात येणार आहे. याची माहिती पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ट्वीट करून दिली आहे.
या दुर्घटनेत जखमी झालेल्या लोकांना 50 हजार रुपयांची मदत देण्याबाबत या ट्वीटमध्ये मोदींनी माहिती दिली आहे. ताडदेव परिसराती भाटिया हॉस्पिटलजवळील 20 मजली इमारतीमधील 18 व्या मजल्यावर आग लागली होती.
अग्निशमन दलाच्या 21 गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या होत्या. या इमारतीमधील 90 लोकांना बाहेर काढण्यात यश आलं आहे. रुग्णालयाकडून मिळालेल्या माहितीनुसार, जळालेल्यांपैकी 12 जणांना जनरल बर्न वॉर्डमध्ये, तर 3 जणांना आयसीयूमध्ये दाखल करण्यात आलं आहे.
नाना चौक गवालीया टँक इथल्या कमला इमारतीला आग लागली होती. सकाळी 7.30 च्या सुमारास ही आगीचा भडका उडाला होता. आगीची माहिती मिळताच अग्निशमन अधिकाऱ्यांना याची माहिती देण्यात आली.