दीपक भातुसे, झी मीडिया.  मुंबई : राज्यात कोरोनाचा हाहाकार उडाला आहे. दररोज 60 हजाराहून अधिक नव्या कोरोनाबाधीतांची नोंद होत आहे. राज्यात रेमडेसिवीर आणि ऑक्सिजनचा प्रचंड तुटवडा जाणवतोय. त्यामुळे राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना फोन केला होता. परंतु त्यांचे बोलने होऊ शकलेले नाही.
 
 मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी राज्यातील रेमडेसिवीर आणि ऑक्सिजनच्या तुटड्यामुळे त्याचा पुरवठा करावा यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना फोन केला होता. परंतु मुख्यमंत्री आणि पंतप्रधान यांच्यात बोलने होऊ शकले नाही.


 पंतप्रधान पश्चिम बंगालच्या निवडणूक प्रचार दौऱ्यावर असल्याने मुख्यमंत्र्यांचे पंतप्रधानांशी बोलणे होऊ शकलेले नाही.  
 
 पंतप्रधान तुम्हाला संपर्क करतील असा निरोप मुख्यमंत्री ठाकरे यांना पंतप्रधान कार्यालयाकडून देण्यात आला आहे.