प्रशांत अंकुशराव, झी मीडिया, मुंबई : सत्तासंघर्षात उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांना मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा द्यावा लागला. तर एकनाथ शिंदे (Eknath Shinde) भाजपाचा हाथ पकडत मुख्यमंत्रिपदी विराजमान झाले. तर  देवेंद्र फडणवीसांनी उपमुख्यमंत्रिपदाची सूत्र हाती घेतली. यामुळे सत्तेची समीकरणे बदलली. सत्ता बदल झाला तसाच बदल संघटनात्मक पातळीवरही झाला. (pm narendra modi photo in eknath shinde group party office in maharashtra nagar mankhurd)


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

सत्ता काबीज केल्यानंतर एकनाथ शिंदेंनी आपला गट मजबूत करायला सुरवात केली. दादर मध्येच शिंदे गट सेना भवन निर्माण करणार आहे. तर शिंदे गटाची पहिली शिवसेना शाखा मुंबईतील मानखुर्दमधील महाराष्ट्र नगर येथे सुरू करण्यात आली. मात्र या शाखेत एक वेगळेपण पाहायला मिळाला.  शिवसेनेच्या या शाखेत उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरे यांचा फोटोला स्थान नाहीये. मात्र पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या फोटोला जागा मिळाली आहे. 


याबाबत स्थानिक खासदार राहुल शेवाळे यांनी प्रतिक्रिया दिली. "उद्धव ठाकरे यांनीच सांगितलं होतं की, 2014 ते 2019 देशाचे विकासाचे काम करण्यासाठी नरेंद्र मोदी यांना साथ द्या . जे हिंदुत्वासाठी नेतृत्व करतात त्यांचे फोटो लावले आहेत.  शासकीय कार्यालयात मोदींचा फोटो असतो. शिवसेना शाखा हे न्याय मंदिर आहे. त्यामुळे हा  फोटो लावला आहे. आम्ही शरद पवार किंवा सोनिया यांचा फोटो लावला नाही", अशी प्रतिक्रिया देत राहुल शेवाळे यांनी आपली भूमिका स्पष्ट करत शिवसेनेला टोलाही लगावला.



शिवसेनेच्या शाखा या मागील 2 वर्षात महाविकास आघाडीची कार्यालयं झाली होती. 1966 सालाची शिवसेना निर्माण करणार, अशी प्रतिक्रिया शेवाळे यांनी व्यक्त केली. मात्र नरेंद्र मोदी यांच्या फोटोमुळे भारतीय जनता पक्ष शिवसेनेला हायजॅक करेल की काय? ही भीती आणि चर्चा पुन्हा एकदा रंगू लागली आहे.