पीएमसी बॅंक घोटाळा : वाधवान पिता-पुत्रासह वरियम सिंगच्या कोठडीत वाढ
पंजाब आणि महाराष्ट्र बॅंक (PMC) घोटाळ्याप्रकरणी तिघांना पोलीस कोठडी सुनावली आहे.
मुंबई : पंजाब आणि महाराष्ट्र बॅंक (PMC) घोटाळ्याप्रकरणी बॅंकेचे अध्यक्ष आणि एचडीआयएलचा माजी संचालक वरियम सिंग याच्यासह राकेशकुमार वाधवान, सारंग वाधवान या तिघांना न्यायालयाने १६ ऑक्टोबरपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. तिघांना सोमवारी किल्ला कोर्टात हजर करण्यात आले होते. यावेळी न्यायालयाच्या बाहेर पीएमसी बँकेच्या खातेदारांनी जोरदार आंदोलन केले. यावेळी आमचे पैसे परत द्या, अशी मागणी केली. तसेच आरोपींवर कठोर कारवाई करण्याची मागणीही यावेळी करण्या आली. दरम्यान, जॉय थॉमसच्या पुण्यातील आणखी नऊ मालमत्तांची माहिती मिळाली आहे.
याआधीही किल्ला कोर्टाबाहेर पीएमसी बँक खातेदारांनी आंदोलन केले होते. काल पुन्हा एकदा आंदोलन केले. दरम्यान, त्याधी पीएमसी बॅंक घोटाळा प्रकरणाला वसईत नवे वळण आले आहे. कारण वसईतील संतप्त पीएमसी बँकेच्या खातेदारांनी रविवारचा सुट्टीचा दिवस साधून बँकेच्या बाहेर आंदोलन केले. आमच्या हक्काच्या पैशांसाठी आम्हाला रस्त्यावर उतरावे लागत असल्याने त्यांनी येत्या विधानसभा निवडणुकीत 'नोटा' ला वोट देण्याचा निर्णय घेतला आहे. गेल्या महिन्यांपासून पैशांसाठी सुरू असलेली फरफट व्यक्त करून सरकारला 'ये कौनसे अच्छे दिन' असा सवाल यावेळी आंदोलनकर्त्यांनी उपस्थित केला होता. कालही किल्ला कोर्ट बाहेर आंदोलन केले.
पीएमसी बँक गैरव्यवहार प्रकरणी अटकेत असलेल्या तिन्ही आरोपींची काल पोलीस कोठडी संपली. त्यामुळे पोलिसांनी राकेश वाधवान, सारंग वाधवान आणि वरियम सिंह यांना काल किल्ला कोर्टात हजर केले. यावेळी पीएमसी खातेधारक न्यायालयाबाहेर जोरदार निदर्शन केलीत.