मुंबई : पीएमसी बँक गैरव्यवहार प्रकरणी एचडीआयएलचे संचालक राकेशकुमार वाधवान आणि सारंग वाधवान या दोघा पितापुत्रांना २४ ऑक्टोबरपर्यंत ईडी कोठडीत ठेवण्यात येणार आहे. तर याप्रकरणी अटक केलेल्या सुरजितसिंग अरोरा या पाचव्या आरोपीला २४ ऑक्टोबरपर्यंत पोलीस कोठडी देण्यात आली आहे. दरम्यान, वाधवान यांनी खरेदी केलेल्या सुमारे १५ नवीन मालमत्तांचा शोध लागला आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

राकेशकुमार वाधवान, सारंग वाधवान, जॉय थॉमस आणि वरियमसिंग या चौघा आरोपींना न्यायालयीन कोठडीत ठेवण्यात आले होते. वाधवान यांनी खरेदी केलेल्या सुमारे १५ नवीन मालमत्तांचा शोध पोलिसांनी घेतला आहे. एचडीआयएल कर्मचाऱ्यांच्या चौकशीत ही माहिती उघड झाली. 


याबाबतचा तपास करण्यासाठी कोठडी हवी असल्याचं ईडीनं मंगळवारी कोर्टात सांगितले. तेव्हा वाधवान पितापुत्रांना २४ ऑक्टोबरपर्यंत ईडी कोठडीत ठेवण्याचा आदेश पीएमएलए कोर्टाने दिला.