मुंबई : sawwa rupaya statement  : पीएमसी घोटाळ्याच्या आरोपानंतर शिवसेना नेते आणि खासदार संजय राऊत (Sanjay Raut) आणि भाजपचे प्रदेश अध्यक्ष चंद्रकांत पाटील (Chandrakant Patil) यांच्यात चांगलाच कलगीतुरा रंगला आहे. चंद्रकांत पाटील यांनी पीएमसी बँक घोटाळ्याबाबत संजय राऊत यांच्यावर केलेले आरोप फेटाळून लावले आहेत. त्याचवेळी राऊत यांनी चंद्रकांत पाटील यांच्यावर टीकास्त्र सोडले आहे. आपण पाटील यांच्यावर सव्वा रुपयांचा दावा ठोकणार आहोत.  त्यांची तेवढीच किंमत आहे, असेही राऊत म्हणाले. त्यानंतर चंद्रकांत पाटील यांची पहिली प्रतिक्रिया आली आहे. (PMC Scam Allegations - Chandrakant Patil vs Sanjay Raut)


संजय राऊत दाखल करणार सव्वा रूपयांचा दावा


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

दरम्यान, चंद्रकांत पाटील यांनी दैनिक ‘सामना’ला पत्र पाठवून शिवसेना नेते संजय राऊत यांच्यावर आरोप केले आहेत. राऊत यांनी हे आरोप दळभद्री असल्याचं सांगत चंद्रकांत  पाटील यांच्यावर सव्वा रुपयांचा दावा लावणार असल्याचे सांगितले. चंद्रकांत पाटील हे सव्वा रुपयावालेच आहेत, असा चिमटाही त्यांनी यावेळी काढला होता. त्याला आता पाटील यांनी उत्तर दिले आहे.   


संजय राऊत यांच्या याच विधानावर भाजप नेते चंद्रकांत पाटील यांनी  समाचार घेत आहे. त्यांनी मिश्किल टिप्पणी केली आहे. काही हरतत नाही. कोणी 100 कोटी तर कोणी 150 रुपयांचा दावा ठोकतो. तसे हे सव्वा रुपयांचे आहे. संजय राऊत हे माझे मित्र आहेत. त्यांना मी सांगू ईच्छितो की, त्यांनी थोडी सक्कम वाढवायला पाहिजे होती. त्याचे कारण असे की, मानहानीचा दावा म्हणजे काय, तर एवढ्या रकमेची  मानहानी झाली. राऊतांची मानहानी ही सव्वा रुपयांची नाही. त्यांनी थोडी रक्कम वाढवालया पाहिजे आहे.  राजकारणात आम्ही एकमेकांना चिमटे काढतो, पण त्याची जखम होता कामा नये. त्यामुळे संजय राऊत यांची मानहानी सव्वा रुपयाची नक्कीच नाही, असे पाटील म्हणाले.