मुंबई: महिलांबाबत वादग्रस्त केल्यामुळे अडचणीत आलेले भाजप आमदार राम कदम यांच्यावर अखेर पोलिसांनी शुक्रवारी अदखलपात्र गुन्हा दाखल केला. मात्र, या कारवाईविषयी विरोधकांनी नाराजी व्यक्त केली आहे. भाजपकडून राम कदम यांना पाठिशी घातले जात असल्याचा आरोपही विरोधकांनी केला. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

राम कदम यांच्यावर कारवाई व्हावी, यासाठी गेल्या तीन दिवसांपासून राष्ट्रवादी काँग्रेसच्या महिला कार्यकर्त्या घाटकोपर पोलीस स्टेशनसमोर ठाण मांडून बसल्या होत्या. मात्र, इतके करुनही पोलिसांनी कदम यांच्यावर अदखलपात्र गुन्हाच दाखल केला. ही कारवाई पुरेशी नाही. इतर कोणीही अशाप्रकारचे वक्तव्य केले असते तर त्याच्यावर तात्काळ दखलपात्र गुन्हा दाखल झाला असता. मात्र, भाजपकडून राम कदम यांना पाठिशी घातले जात असल्यामुळे पोलिसांनी त्यांच्याविरोधात अदखलपात्र गुन्ह्याची नोंद केली. 


आम्ही याविरोधात न्यायालयात जाणार आहोत. कायदेशीर लढाई लढून राम कदमांवर गुन्हा दाखल करायला भाग पाडू, असा निर्धार राष्ट्रवादी काँग्रेसच्या महिलांनी व्यक्त केला आहे.