मुंबई : दहीहंडी दरम्यान नियमांचं उल्लघन करणाऱ्यांवर कारवाईचे स्पष्ट संकेत मुंबई पोलिसांनी दिले आहे. दहीहंडीत भाग घेणाऱ्या गोविंदांवर वयाची मर्यादा असून १४ वर्षाखालील मुलांमुलींच्या सहभागावर मुंबई उच्च न्यायालयाने पूर्णपणे बंदी घातली आहे. गोविंदा उत्सवादरम्यान १४ वर्षाखालील मुलां-मुलींचा सहभाग आढळल्यास मुंलांचे पालक, गोविंदा पथकांचे प्रमुख आणि आयोजक या सगळ्यांवर कारवाई केली जाईल असे स्पष्ट संकेत मुंबई पोलिसांनी दिले आहेत.


आयोजनावर नजर


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

 २०१४ साली मुंबई उच्च न्यायालयाने दहीहंडीच्या उंचीवर आणि गोविंदांच्या वयोमर्यादेवर निर्बंध घातले होते. त्यानंतर नियमांसंदर्भात अनिश्चिततेच वातावरण होतं. राज्य सरकारने दहीहंडीचा समावेश साहसी क्रीडा प्रकारात केल्यानंतर आता किती थर लावायचे यावर कोणतंही बंधन नाहिये.


मात्र वयोमर्यादेची अट उच्च न्यायालयाने कायम ठेवली असल्यानं मंडळांसह आयोजकांनाही ही अट काटेकोरपणे पाळावी लागणार आहे.